Indian Super League Dainik Gomantak
गोवा

ISL FC Goa Transfer: एफसी गोवासोबत रॉलिनची ‘घरवापसी’

एका मोसमाचा करार: भारताचा आंतरराष्ट्रीय बचावपटू ‘लोन’वर खेळणार

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

Indian Super League इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेड आणि मुंबई सिटीकडून खेळल्यानंतर नुवे येथील रॉलिन बोर्जिस आता एफसी गोवासोबत ‘घरवापसी’ करेल. गोव्यातील संघाने भारताच्या आंतरराष्ट्रीय मध्यरक्षकाशी एका मोसमाचा ‘लोन’ करार केला आहे.

भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या इंटरकाँटिनेंटल कप स्पर्धेसाठी ३१ वर्षीय रॉलिनची सध्या भारतीय संघात निवड झाली आहे. अनुभवी खेळाडूच्या निवडीने आता एफसी गोवाची मध्यफळीत धारदार होण्याचे संकेत आहेत.

मागील तीन वर्षांच्या कालावधीत दोन वेळा लीग विनर्स शिल्ड आणि एकवेळ आयएसएल करंडक जिंकलेल्या मुंबई सिटीचे रॉलिनने प्रतिनिधित्व केले. या संघाकडून तो आता ‘लोन’वर गोव्यात आला आहे. भारतातर्फे तो ३३ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.

‘‘मी एफसी गोवातर्फे खेळेन असे मला नेहमीच वाटायचे. हे माझे नशीबच आहे, जे अखेरीस सत्यात उतरले, त्याबद्दल खूप आनंदी आहे,’’ अशी प्रतिक्रिया रॉलिनने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले.

‘‘माझ्या कारकिर्दीतील नव्या अध्यायाची ही सुरवात असल्याचे मी मानतो. संघाच्या यशात योगदान देण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे तो पुढे म्हणाला.

‘‘रॉलिन भारतीय फुटबॉलमधील प्रस्थापित नाव आहे आणि त्याने आयएसएलमधील मागील काही वर्षांत ते सिद्ध केले आहे. त्याच्या समावेशामुळे आमच्या मध्यफळीचे आकारमान वाढेल, त्याच्या सर्वव्यापी शैलीचा आम्ही पुरेपूर वापर करू,’’ असे रॉलिनचे संघात स्वागत करताना एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी सांगितले.

‘‘यापूर्वी आम्ही रॉलिनला करारबद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण तो सफल ठरला नाही. यावेळेस ते साध्य झाले. संघात आणि ड्रेसिंग रुममध्ये तो खूप सकारात्मक प्रभाव याची मला खात्री आहे,’’ असे रवी पुढे म्हणाले.

विविध संघांसाठी योगदान

रॉलिन 2012 ते 2016 या कालावधीत आय-लीग स्पर्धेत स्पोर्टिंग क्लब द गोवातर्फे खेळला. आयएसएल स्पर्धेतील नॉर्थईस्ट युनायटेडशी तो 2016 मध्ये करारबद्ध झाला, मध्यंतरी तो ईस्ट बंगालकडून काही काळ ‘लोन’वर खेळला.

2019-20 मध्ये तो मुंबई सिटी संघात दाखल झाला. या संघातर्फे तो एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतही खेळला. 2019 साली आशियाई करंडक स्पर्धेत खेळलेल्या भारतीय संघात त्याचा समावेश होता.

रॉलिन बोर्जिसच्या कारकिर्दीतील प्रमुख टप्पे

  • 2018-19 मध्ये आयएसएल उपांत्य फेरीत गाठलेल्या नॉर्थईस्ट युनायटेडचा प्रमुख सदस्य

  • मुंबई सिटीकडून आयएसएल लीग विनर्स शिल्डचा दोन वेळा (2020-21, 2022-23) आणि एक वेळ (2020-21) करंडकाचा मानकरी

  • भारतीय संघातून खेळताना 2015 साली सॅफ स्पर्धा, 2017 साली तीन देशांच्या स्पर्धेत, तर 2018 साली इंटरकाँटिनेंटल कप स्पर्धेत विजेता

  • 2016 साली अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू

  • आयएसएल स्पर्धेत 103 सामने, 7790 मिनिटे, 8 गोल, 5 असिस्ट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT