Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress: कुडचडेतील 'त्या' प्रकाराला लोकप्रतिनिधी जबाबदार

पावसामुळे बुजलेल्या गटारातील सांडपाणी आणि कचरा दुकानांत आणि घरांमध्ये शिरले आहे.
Published on

Goa Congress शनिवारी गोव्यात झालेल्या पहिल्याच पावसाने कुडचडेवासीयांना जेरीस आणले असून याला लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याची टीका काँग्रेसने पत्रकार परिषद घेत केलीय.

यावेळी बोलताना कुडचडे काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष पराग सबनीस यांनी "या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अन्यथा या प्रकारांमुळे कुडचडेवासीयांना आणखी बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागणार" असे म्हटलेय.

Goa Congress
काणकोण येथे रस्त्याकडेच्या लोखंडी बॅरिकेडमध्ये घुसली कार; एकजण जखमी

कुडचडेत सिव्हरेजच्या कामामुळे सर्व रस्ते खोदले आहेत. तसेच भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम सुरु असून खोदलेल्या चरांची माती गटारात जाऊन गटार बुजले आहेत.

काल झालेल्या पावसामुळे या बुजलेल्या गटारातील सांडपाणी आणि कचरा दुकानांत आणि घरांमध्ये शिरले आहे.

बाजार परिसरातील गटारे साफ करण्यात आली असून अद्याप गावातील गटारांची साफसफाई झालेली नसल्याने नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत असल्याचे सबनीस यांनी सांगितले.

गटार तुंबण्यासह कुडचडेत अनेक विषय प्रलंबित आहेत. या समस्यांवर संबंधित खात्याने आणि लोकप्रतिनिधींनी योग्य ती उपाय योजना न केल्यास काँग्रेस घेराव घालत आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com