नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, नाजेरियन महिलेला ओल्ड गोवा पोलिसांकडून अटक

दोन दिवसांपूर्वीच जुने गोवे पोलिसांच्या पथकाने अशाच पद्धतीने एका युवकाला अटक केली होती
 Goa Job Scam
Goa Job ScamDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Job Scam नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक लुबाडणूकीचे प्रकार सध्या गोव्यात दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली असून यासंबंधी जुने गोवा पोलिसांनी एका नायजेरियन महिलेला ताब्यात घेतले आहे तर तिचा अन्य एक साथीदार फरार आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे दोघे नोकरीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करीत असून ज्यांना नोकरीची गरज होती अशा गोव्यातील काही जणांकडून त्यांनी बरेच पैसे आणि पासपोर्ट देखील गोळा केले होते.

दरम्यान आवश्यक तेवढी रक्कम हाती आल्यानंतर त्यांनी संबंधितांना उलट सुलट कारणे सांगून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

 Goa Job Scam
काणकोण येथे रस्त्याकडेच्या लोखंडी बॅरिकेडमध्ये घुसली कार; एकजण जखमी

जुने गोवा पोलिसांना या घटनेची खबर मिळताच त्यांनी या जॉब रॅकेटचा पर्दाफाश करत एका एका नायजेरियन महिलेला ताब्यात घेतले तर तिचा अन्य एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला.

 Goa Job Scam
Goa Congress: कुडचडेतील 'त्या' प्रकाराला लोकप्रतिनिधी जबाबदार

दोन दिवसांपूर्वीच जुने गोवे पोलिसांच्या पथकाने परदेशात तसेच प्रवासी बोटींवर नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून सुमारे 13 लाखांना गंडा घालणाऱ्या अहमदनगर येथील अनिकेत गायकवाड या युवकाला मुलुंड-मुंबई येथे अटक केली होती. आणि आता ही दुसरी घटना उघडकीस आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com