Goa CM Pramod Sawant and rahul mhambre Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सावंत सरकारला ‘आप’च्या घोषणांची धास्ती

आता झाली गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची आठवण

दैनिक गोमन्तक

पणजी: जुलै महिन्यात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या गोवा (Goa) दौऱ्यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. सावंत सरकारने तेव्हापासून या घोषणेची धास्ती घेतली असल्याची टीका आम आदमी पक्षाने केली आहे.

‘आप’ने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिल्यानंतरच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना शेतकऱ्यांची आठवण झाली. त्यामुळेच त्यांनी वीज समस्येची कबुली दिली. यापूर्वी गोव्याचे शेतकरी वर्षानुवर्षे मदतीची मागणी करत होते. इतर राज्यांप्रमाणे गोव्यातील शेतकऱ्यांचेही वेगवेगळ्या कारणांनी नुकसान होत आहे.

दिलेल्या वचनावर पलटणारे म्हणून सावंत सरकार यांची ओळख आहे. गोव्यातील शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा असताना नुकतीच केलेली शेतकऱ्यांसाठी नवीन घोषणा इतर घोषणांप्रमाणे जुमला बनू नये, अशी अपेक्षा राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी व्यक्त केली आहे. 11 हजार पंपांना वीज देण्याची योजना किंमत किमान 300 कोटींची असेल. यामध्ये घोटाळा होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सरकारला सौर क्षमता वाढवण्यास तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास खरोखरच रस असेल तर आप त्यांना पूर्ण सहकार्य करून दिल्लीतील ‘आप’ची ‘मुख्यमंत्री किसान आय बढोतरी’ योजनेची माहिती देईल, असे ‘आप’ने जाहीर के्ले आहे.

केजरीवालांच्या योजनांचा अभ्यास करा

पहिल्यांदा ‘आप’ने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. जर डॉ. सावंत यांना खरोखर स्पर्धा करायची असेल तर त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री किसान योजनेचा अभ्यास करावा. या योजनेअंतर्गत शेतकरी सौर ऊर्जा संयंत्रांसाठी जमीन देतात, त्याबदल्यात त्यांना मोफत वीज मिळते. तसेच प्रतिएकर 1 ते 4 लाख रुपये मिळतात, अशी माहिती म्हांबरे यांनी दिली.

सौर पंपांची योजना अपयशाची ग्वाही

‘मुख्यमंत्री किसान आय बढोतरी'' या योजनेअंतर्गत, शेतकरी सौर ऊर्जा संयंत्रासाठी जमीन पुरवतात, ज्यासाठी त्यांना मोफत वीज मिळते तसेच प्रतिएकर 1 ते 4 लाख उत्पन्न मिळते. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. सावंत यांनी सौर पंपांची केलेली घोषणा ही सरकारच्या अपयशाची ग्वाही देत असल्याची टीका ‘आप’चे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT