Goa Election: BJP विरोधात आघाडीसाठी शिवसेनेचे जोरात प्रयत्‍न !

संजय राऊतांची गोव्यातील विविध नेत्‍यांशी चर्चा सुरू
Goa Election: Sanjay Raut
Goa Election: Sanjay RautDanik Gomantak

पणजी: उत्तर प्रदेशसह (UP) गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) भाजपविरोधात (BJP) महाविकास आघाडी स्थापण्यात शिवसेनेला (ShivSena) रस आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

आम्ही महाराष्ट्रासारखीच आघाडी सहा महिन्यांत निवडणुका होणाऱ्या इतर राज्यांमध्ये स्थापन करू पाहत आहोत. त्या दृष्टीने आम्ही विविध नेत्यांशी चर्चा चालविली आहे. ही चर्चा अजून निष्कर्षाप्रत आलेली नसली, तरी आमची चर्चा सुरूच राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या दोन्ही राज्यांत सत्ता राखण्यासाठी भाजपने आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे.

Goa Election: Sanjay Raut
Goa Election: बंडोबांमुळे काँग्रेसच्या वाटेत काटे

राहुल गांधी यांची भेट घेणार

एका प्रश्नावर राऊत म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी आम्ही सतत संवाद साधत असतो आणि तेही स्वतः गोव्यात आघाडी निर्माण करण्यासाठी अनुकूल आहेत. पुढच्या आठवड्यात या दोन राज्यांतील आघाडीसंदर्भात मी राहुल गांधी यांची भेट घेणार आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्‍ठींना आघाडीविषयी अनुकूलता वाटते.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी यापूर्वी भाजपशी लढण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. राऊत म्हणाले की आम्ही उत्तर प्रदेशात 80 ते 100 जागांवर लढणार आहोत. येथेही आम्हाला जिंकण्याचा विश्‍वास आहे.

Goa Election: Sanjay Raut
Goa Election: उमेदवारी दिल्लीतूनच असे सांगत, बंडाळींवर भाजपचा तात्पुरता तोडगा

तर 20 जागा स्वतंत्र

शिवसेनेला राष्ट्रवादी आणि इतर पक्षांशी आघाडी व्‍हावी, असे मनापासून वाटते. परंतु, ही आघाडी होऊ शकली नाही, तर 20 जागा स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी आम्ही ठेवली आहे, गोव्यात आम्ही अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे आम्ही चांगले उमेदवार देऊ.

काँग्रेसवर विश्‍वास ठेवणे कठीणच

गोव्यामध्ये काँग्रेस पक्षसंघटनेला युतीपेक्षा स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यात रस असल्याचे आणि त्या पक्षाच्या नेत्यांनी तशी पावले टाकायला सुरुवात केल्याचे संजय राऊत यांच्या निदर्शनास आणले असता, काँग्रेसवर विश्वास ठेवता येत नाही, अशी मल्लिनाथी त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com