गोवा

Viral Post: अकेली औरत क्या ही करेगी! हिंदी भाषिक पर्यटकांनी आफ्रिकन अमेरिकन महिलेला गोव्यात दिला त्रास; पोस्ट व्हायरल

Goa Viral Post: आफ्रिकन अमेरिकन महिला एका दुकानाबाहेर दूध खरेदी करण्यासाठी आली असता ही घटना घडली.

Pramod Yadav

पणजी: गोव्यातील पर्यटन आणि पर्यटकांच्या सुरक्षेवरुन बरीच चर्चा सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरती होत असते. अनेकांनी त्यांना गोव्यात आलेल्या विचित्र अनुभवांचे कथन केले आहे. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोव्यात अनुचित घडणाऱ्या घटना येथील पर्यटनाला गालबोट लावण्याचे काम करतात.

राज्यात अलिकडेच एका आफ्रिकन अमेरिकन महिलेला हिंदी भाषिक पर्यटकांकडून छळाचा सामना करावा लागला, असा दावा एका गोमंतकीय महिलेने केला आहे.

आफ्रिकन अमेरिकन महिला एका दुकानाबाहेर दूध खरेदी करण्यासाठी आली असता ही घटना घडली. महिलेला पाहून ८ - १० हिंदी भाषिक पर्यटकांनी तिच्याकडे फोटोसाठी मागणी केली. पण, या विदेशी महिलेने फोटोसाठी नकार दिला.

महिलेने नकार दिल्यानंतर या पर्यटकांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जा तू फोटो काढ, अकेली औरत क्या ही करेगी, असे ग्रुपमधल्या एकाने दुसऱ्याला सांगितले, असे प्रसंग कथन Reddit या समाज माध्यमावर एका गोमंतकीय महिलेने केले आहे.

Viral Post

या प्रसंगामुळे मला धक्काच बसला आणि गोवा आता सुरक्षित राहिला नाही, असे महिलेने व्यक्त केले. अखेर या महिलेने आणि दुकानदाराने मध्यस्थी करत विदेशी महिलेला तेथून सुखरुप बाहेर काढून तिच्या इच्छित स्थळी जाण्यास मदत केली. गोव्यात मी अशा पद्धतीची घटना यापूर्वी अनुभवली नाही, असे या महिलेने म्हटले आहे.

दरम्यान, यावर अनेकांनी मत व्यक्त केली असून, काही जणांनी त्यांना देखील गोव्यात विचित्र अनुभव आल्याचे सांगितले आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका महिलेने गोव्यात तिला देखील असाच काहीसा अनुभव आल्याचे सांगितले. काही लोक त्यांच्याकडे एकसारखे पाहत होते. फोटो काढत होते. गोव्यातील स्थानिक लोक चांगले आहेत पण, बाहेरुन येणारे पर्यटक त्रास देतात, असे मत या महिलेने मांडले.

या घटनेवर मत व्यक्त करताना आणखी एका युझरने मोरजी समुद्रकिनाऱ्यावर आलेला अनुभव सांगितला. मोरजीत फार पर्यटक नव्हते पण काही बिहारी पर्यटक होते त्यांनी मी समुद्रात पोहत असताना मला घेण्याचा प्रयत्न केला, असे या महिलेने म्हटले आहे. मला खूप भीती वाटली होती, अखेर माझे मित्र माझ्या मदतीला धावून आले, असा अनुभव महिलेने सांगितला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT