case
case  
गोवा

अफगाणिस्तान विद्यार्थ्यावर चाकूहल्ला केलेला फरारी जॉँटी कोईआ गजाआड

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी: गोवा विद्यापीठाचा विद्यार्थी असलेल्या अफगाणिस्तान तरुण मतितुल्ला आरी याच्यावर चाकूने हल्ला करून फरारी असलेल्या नावेली - मंडूर येथील जॉँटी आब्रोझ कोईआ (२१) याला शिरदोण येथील बीचवर काल रात्री पणजी पोलिसांनी शिताफीने अटक केली.या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित जाँटी याला चार दिवस पोलिस कोठडी न्यायालयाने दिली आहे.

गेल्या २० जानेवारीला दोना पावल येथील मणिपाल इस्पितळाजवळ चौघा तरुणांनी मतितुल्ला या अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करून पसार झाले होते.हे हल्लेखोर ज्या दुचाकीने आले होते त्याचा क्रमांक जखमी झालेल्या मतितुल्ला याने पोलिसांना दिला होता.या क्रमांकाचा शोध घेत सतिश निलकंठे, सुरेश मेगेरी व डेस्मंड फर्नांडिस या तिघांना अटक केली होती.चाकूने हल्ला करणारा मुख्य आरोपी जाँटी फरारी झाला होता.पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन शोध घेतला मात्र तो सापडला नव्हता.या घटनेनंतर त्याने मुंबईला पलायन केले होते.काल तो गोव्यात परतला असता पोलिसांच्या खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्याच्या मुसक्या आवळण्यात पणजी पोलिसांना यश आले.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सतीश निलकंठे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर संशयित डेस्मंड फर्नांडिस व सुरेश मेगेरी या दोघांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.मतितुल्ला या हल्ल्यानंतर एका खासगी इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात ठेवून उपचार सुरू होते.त्याच्यावरी धोका टळल्यानंतर त्याची रवानगी सर्वसाधारण विभागात करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Crime News: शारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीचा खून; पाच वर्षानंतर पती दोषी

Alcohol Seized : महाराष्‍ट्रातून गोव्‍यात आणलेली ८.४१ लाखांची दारू पकडली

Panaji News : बाबूशला पंच रबरस्टँप म्हणून हवेत; सिसील-फ्रान्सिस यांचा आरोप

Loksabha Election 2024 : मडकईतून ९० टक्के मतदानासाठी प्रयत्न भर! सुदिन ढवळीकर

मोदी सरकारचा मोठा निर्णय; कांदा निर्यातीस दिली परवानगी

SCROLL FOR NEXT