Amit Palekar Congress Join Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: आपल्याकडून विश्वासघात होणार नाही! काँग्रेस प्रवेशावेळी अमित पालेकरांनी नेत्यांना दिली ग्वाही

Amit Palekar Congress Entry: सांताक्रूझ मतदारसंघातून काँग्रेसमधून निवडून आलेल्यांनी इतर पक्षात उड्या मारल्या आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सांताक्रूझ मतदारसंघातून काँग्रेसमधून निवडून आलेल्यांनी इतर पक्षात उड्या मारल्या आहेत. निवडून येण्यापूर्वी त्यांनी सर्व देवधर्मांच्या शपथा घेतल्या, त्यांनी देवतांचा अपमान केला नाही तर त्या-त्या मतदारांचा विश्वासाला तडा दिला आहे. यामागे सूत्रधार भाजप होता, काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असून, आपल्याकडून सांताक्रूझमधील जनतेचा कधीच विश्वासघात होणार नाही, अशी ग्वाही ॲड. अमित पालेकर यांनी पक्ष प्रवेशावेळी दिली.

मेरशी येथील शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पक्षप्रवेशावेळी ॲड. पालेकर यांनी काँग्रेसचा पक्षसदस्यत्वचा अर्ज प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी व्यासपीठावर गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, ॲड. कार्लोस फेरेरा, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, उपाध्यक्ष एम. के. शेख, सुनील कवठणकर, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतीक्षा खलप, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक यांच्यासह विविध सेलचे अध्यक्ष, विविध विभागातील गटाध्यक्ष यांची उपस्थिती होती.

ॲड. पालेकर यांनी आपली कौटुंबिक वाटचाल ही सर्वधर्म समभाव या विचाराने होत असल्याचे उदाहरण दिले. ठाकरे यांनी काँग्रेसची वाटचाल ज्याप्रमाणे सुरू आहे, ती पाहता २०२९ मध्ये केंद्रात निश्चित बदल होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी पालेकर आपण नेते आहात, त्यामुळे तुम्ही एकत्र बसून एकमेकांना साथ द्या, असा ठाकरे यांनी सल्ला दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT