Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: खाणीला अडवलपालवासीयांचा विरोधच

Goa Mining: काहींचे समर्थन : किरकोळ गोंधळ वगळता डिचोलीत जनसुनावणी सुरळीत

दैनिक गोमन्तक

Goa Mining:

किरकोळ अपवाद वगळता अडवलपाल खाणीसाठी शुक्रवारी (ता.15) घेण्यात आलेली जनसुनावणी सुरळीतपणे पार पडली. सकाळी सुरू झालेली ही जनसुनावणी सायंकाळपर्यंत आटोपली. या जनसुनावणीवेळी अपेक्षेप्रमाणे खाणव्याप्त अडवलपालच्या लोकांची उपस्थिती जाणवली नाही.

मात्र, उपस्थित असलेल्या अडवलपालच्या लोकांनी खाणविरोधात भूमिका मांडली. मात्र, अपेक्षेप्रमाणे विरोधाची ‘धार’ दिसून आली नाही. खाण परिक्षेत्र आणि पर्यावरण आघात मूल्यांकन अहवालाला (ईआयए) अडवलपालच्या लोकांनी तीव्र आक्षेप घेतला.

‘ईआयए’ अहवाल खोटा असल्याचा दावा करतानाच गाव उद्‌ध्वस्त होत असेल, तर गावात खाण व्यवसाय नकोच, अशी भूमिका मांडली. तर थिवी आणि अन्य भागातील बहुतांश लोकांनी खाणीला समर्थन दिले.

अडवलपाल-थिवी खाण ब्लॉकअंतर्गत फोमेन्तो रिसोर्सीस कंपनीला खाणीसाठी पर्यावरण दाखला (ईसी) मिळवण्यासाठी ही जनसुनावणी घेण्यात आली होती. जनसुनावणीवेळी ‘ईआयए’ अहवाल दिशाभूल करणारा आणि खोटा आहे.

तसेच नैसर्गिक जलस्रोत आणि शेती-बागायती नष्ट होत असेल तर आम्हाला खाण व्यवसाय नको, अशी भूमिका अडवलपालच्या लोकांनी घेतली. प्रेमनाथ सिनाय साळगावकर, आनंद गाड, नेताजी गावकर, कला नाईक आदी अडवलपालच्या लोकांनी खाणीविरोधात भूमिका मांडली.

दुसऱ्या बाजूने सिरसई-थिवी आदी भागातील बहुतांश लोकांनी आपले मत मांडताना खाणीला समर्थन दिले. खाणपीडित घटकांच्या हितासाठी खाण व्यवसाय सुरू होणे, ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT