Aditya Thackeray Goa Visit Dainik Gomantak
गोवा

आणि म्हणूनच शिवसेनाच गोव्यात विजयी होणार: आदित्य ठाकरे

ज्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आणि आम्ही इथे आलो आहोत; आदित्य ठाकरे

दैनिक गोमन्तक

Aditya Thackeray Goa Visit: गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांचे प्रमुख नेते गोव्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी गोव्यात येत आहेत. आज महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते वास्को (Vasco), पेडणे (Pernem), साखळी (Sanquelim) येथे सभा घेऊन शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. (Aaditya Thackeray Goa Visit today

आज दुपारी आदित्य ठाकरे दाबोळी विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी वास्को येथील जाहीर सभेत जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, 'गोव्याच्या आणि आपल्या सगळ्यांचे एक वेगळे नाते आहे. कारण बर्‍याच जणांचे कुलदैवत, देवस्थान इथे गोव्यातच आहेत. आता गोव्यात शिवसेना म्हणजे काय आहे हे, जनतेला समजायला लागले आहे. गोव्यातल्या भूमिपुत्रांना न्याय कसा द्यायचा हे शिवसेनेकडून समजून घेतले पाहिजे. कारण आपण जर आमच्या पक्षाची पार्श्वभूमी पाहिली, तर महाराष्ट्रामध्ये आम्ही केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. तुम्ही जर वर्तमान पत्रे वाचली असतील तर तुम्हाला हे समजेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सलग दोन वर्ष 'टॉप फाइव्ह' मध्ये येत आहेत.

कोविड काळात (Corona Pandemic) महाराष्ट्राचे योगदान आपण सगळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे हीच नीती घेऊन आम्हाला गोव्यात काम करायचे आहे. ज्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आणि आम्ही इथे आलो आहोत.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, गोव्यात विकासाच्या नावाने फ्लायओव्हर, रस्ते दाखवतात. पण हा विकास होतो कुणाचा कॉन्ट्रॅक्टर्सचा होतो का लोकांचा होतो हा एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. फ्लायओव्हर, हायवे करत असतो तेव्हा पर्यावरणाचा -हास होतो की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण झाडे किती तोडणार आहो आपण, डोंगर किती पोखरणार आहो आपण,याचा आचार विचार काही नाही. गोव्याची शान होती, हिरवागार गोवा होता तो कुठेतरी ओसाड होत चालला आहे का हा प्रश्न सतावतोय.आता आम्ही प्रत्येक निवडणूक लढणार नाही तर जिंकणार, तुमचा विश्वास दृढ करणार, आपण येथे प्रचारासाठी नाहीतर तुमच्या आशीर्वाद घ्यायला आलो कारण आम्हाला नवा गोवा बघायचा आहे तो आपल्या आशीर्वादाने असेल व तो आपल्यासाठी असेल.

आता कोण काय करत आहे त्याबद्दल आपण बोलायला नको. आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे ते गोव्याची पुढील 5 वर्षे कशी असतील त्यावर. आपण आता बघितले तर केंद्रातून अनेक राष्ट्रीय नेते गोव्यात येत आहेत. मोठमोठी खोटी आश्वासने देत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातून कोणीतरी जनतेचे भले करण्यासाठी इथे येत आहे. तर मी तुम्हाला विचारतो की तुम्ही कोणासोबत आहात, शिवसेनेसोबत आहात की दुसऱ्यांसोबत?, असे म्हणत त्यांनी गोवेकरांना भावनिक साद घातली.

आधीच्या राज्यकर्त्यांनी गोव्यासाठी काय केले?

गोव्यात आपण दरवर्षी फिरायला येतो, बीचवर जातो. इथे सेव्हन स्टार आणि फाईव्ह स्टार हॉटेल्स झालेत; पण स्थानिक लोकांचे प्रश्न कोणच सोडवत नाही. इथल्या लोकांना अजूनही पाण्याचे प्रश्न उद्भवतात. मला या राज्यकर्त्यांना हेच विचारायचे आहे की तुम्ही नेमके गोव्यासाठी काय केले? त्यामुळेच शिवसेनेचे आमदार घरोघरी जातील, लोकांचे प्रश्न जाणून घेतील आणि त्यावर तोडगा काढतील. जे आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि इतर अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, ते आवाज आणि समस्या आम्ही जाणून घेऊ आणि म्हणूनच शिवसेनाच गोव्यात विजयी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपवर टीका

सत्तेतले आणि केंद्रातले मंत्री आता गोव्यामध्ये येऊन, हे करू ते करू सांगत आहेत. मग गेले 10 ती कामे का नाही झालीत? तुमची केंद्रात पण सत्ता आहे आणि इथे पण सत्ता आहे, तरीसुद्धा तुम्ही 10 वर्षात कामे केली नाहीत. विनाकरण लोकांना खोटी आश्वासने आणि जुमलेबाजी करून फसवू नका. नक्की इथे विकास कुणाचा होतोय, इथल्या जनतेचा की फक्त मंत्र्यांचाच? हा मोठा प्रश्न आहे, असे म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्ष भाजपवर सडकून टीका केली.

देशातील सामाजिक वातावरण भाजप सरकारने बिघडविले ते म्हणाले, ''गोव्यातील भाजप सरकारने कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडलं. मात्र शिवसेना गोवेकरांना प्राधान्य देणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचं मॉडेल घेऊन शिवसेना गोव्यात आली आहे. आणि आम्ही हे मॉडेल गोव्यात यशस्वी करुन दाखवणार आहोत. त्याचबरोबर गोव्यातील पर्यटन वाढविण्यासाठी आम्ही सातत्याने काम करणार आहोत. तसेच गोव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. गोव्यात फाई स्टार हॉटेल आले, विकास झाला, मात्र सर्व सामान्य गोवेकरांच्या घरात पाणी पोहोचले नाही.

इथली निवडणूक लढण्याआधी आम्हाला इथला लोकांचा विश्वास जिंकायचा आहे. आज मी इथे प्रचारासाठी आलो नाही तर आपले आशीर्वाद घ्यायला आलो आहे. त्यामुळे गोव्यात शिवसेनेला संधी देऊन नव्या सरकारला संधी देण्याचे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

SCROLL FOR NEXT