Ban For Tobacco  Dainik Gomantak
गोवा

कदंब बस स्थानकांवर तंबाखू उत्पादने विक्रेत्यांवर होणार कारवाई

कुठल्याही कदंबच्या बसस्थानकावर तसेच त्‍या परिसरात तंबाखू उत्पादने विकता येणार नाहीत, तसेच अशी उत्पादने विकत घेता येणार नाहीत.

दैनिक गोमन्तक

सासष्टी : कदंब वाहतूक महामंडळाने आपल्या प्रत्येक बसस्थानकांवर ‘तंबाखूवर्ज क्षेत्र’ (नो टोबेको झोन) म्हणून सूचना फलक लावले आहेत. त्यामुळे कुठल्याही कदंबच्या बसस्थानकावर तसेच त्‍या परिसरात तंबाखू उत्पादने विकता येणार नाहीत, तसेच अशी उत्पादने विकत घेता येणार नाहीत.

(Action will be taken against the sellers of tobacco products at Kadamba bus stand in goa)

‘गोवा कॅन’ या ग्राहक फोरमकडून अलीकडेच कदंब महामंडळाला बसस्‍थानकांवर अशा प्रकारचे फलक लावावेत, अशी सूचना करण्‍यात आली होती. जागतिक तंबाखू निर्मूलन दिनानिमित्त गोवा कॅनने अशा आशयाचे सूचनापत्र कंदब महामंडळाला दिले होते व एका महिन्याच्या आत हे फलक लावावे असे त्यात नमूद केले होते.

आता हे फलक पणजीसह मडगाव, कुंकळ्ळी, काणकोण, कुडचडे कदंब बसस्थानकांवर लावले आहेत. मडगाव बसस्‍थानकावर केवळ एकच सूचना फलक लावलेला आहे. हे फलक ठळक अशा दोन-तीन ठिकाणी लावावेत, अशी मागणी होत आहे.

तंबाखू निर्मूलनासाठी आम्ही अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. सध्‍या आम्ही बसस्‍थानकावर सूचना फलक लावले आहेत. अधूनमधून प्रत्येक बसस्थानकावर आकस्मिक छापे टाकले जातील व कोणी दोषी सापडल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.
- गिरीश गावडे, मडगाव डेपोचे व्यवस्थापक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT