Sweet Mart
Sweet Mart Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthiच्या मुहूर्तावर गोव्यातील स्वीट मार्टवर कारवाई

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) पार्श्वभूमिवर वैद्यमापन खात्याने केपे व कुडचडे परिसरातील स्वीटमार्टमध्ये (Sweet Mart in Goa) केलेल्या पाहणीत कायद्याचे उल्लंघन करुन मिठाईची शॉर्ट डिलिव्हरी (short delivery of sweets) करणाऱ्या तीन स्वीटमार्टवर कारवाई केली.

ही कारवाई कुडचडे वैद्यमापन खात्याचे निरीक्षक विकास कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वैद्यमापन खात्याने केलेल्या पाहणीत ग्राहकांना मिठाई करताना काही स्वीटमार्टमध्ये शॉर्ट डिलिव्हरी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. अशा लहान वितरणामध्ये स्वीटमार्ट पॅकेटचे वजन विचारण्यात येत नसून याचा थेट फटका ग्राहकाना फटका बसतो.

कुडचडे तसेच केपेत ही शॉर्ट डिलिव्हरी करणाऱ्या तीन स्वीटमार्टवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. स्वीटमार्टकडून करण्यात येणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ग्राहकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

दरम्यान वजन आणि माप खात्याने शनिवारी दुपारी डिचोलीत एका हार्डवेअर दुकानावर धाड घालून बनावटरित्या विक्रीस ठेवलेला माल जप्त केला होता. यात ड्रील मशीन आदी पॉवर टूल साहित्य जप्त केले. येथील दीनदयाळ सभागृहाजवळील महालक्ष्मी सेल्स अँड सर्व्हिस या दुकानावर ही धाड घालण्यात आली होती. जप्त केलेल्या मालावर उत्पादक कंपनी, उत्पादन तारीख याची माहिती नमूद करण्यात आली नव्हती. काही टूलांवर किंमत नमूद करण्यात आली नव्हती. तर काही उत्पादनावरील किंमत काढून टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे. सध्या ग्राहक खात्याची गोव्यात घडक मोहीम चालू असून ग्राहकांची होणारी फसवणूक दुर करण्याचे प्रयत्न चालू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

Goa Today's Live News: कॅथलिक विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी - चर्चिल आलेमाव

Sam Pitroda: ‘’भारतात पूर्वेकडील लोक चिनी तर दक्षिणकेडील लोक आफ्रिकनसारखे दिसतात...’’ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा पुन्हा बरळले

Lok Sabha Election 2024: मतदान करतानाचा फोटो काढताना फातोर्डा येथे महिलेला पकडले; चौकशीअंती सुटका

SCROLL FOR NEXT