liquor bottles Gomantak Digital Team
गोवा

परिसर गलिच्छ : मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच; कारवाई होत नाही

मुरगाव-हार्बर टेकडीवर अनैतिक धंद्यांना ऊत

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को : मुरगाव-हार्बर येथे टेकडीवर अनैतिक धंद्यांना ऊत आला आहे. येथील परिसर गलिच्छ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार येथील नागरिकांकडून मुरगाव पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

मुरगाव-हार्बर येथील टेकडीवरील सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. या ठिकाणी लोकवस्ती तसेच श्री दामोदर ईश्वटी राष्ट्रोळी देवस्थान आहे. या टेकडीचे पर्यटनदृष्ट्या सुशोभीकरण करण्याचा मनोदय माजी मंत्री मिलिंद नाईक यांनी बाळगला होता व त्यादृष्टीने श्रीफळ वाढवून उद्‌घाटनही करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत या टेकडीचे सौंदर्यीकरण करण्यात आलेले नाही.

याविषयी मुरगाव पोलिस स्थानकात लेखी तक्रार करण्यात आल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. मात्र, यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. तसेच येथील मंदिरात शेकडो भाविक श्रींच्या दर्शनासाठी येतात. पुढच्या महिन्यात या मंदिरात उत्सव आहे. या उत्सवात भाविकांना त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करून याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांना होतोय त्रास

या टेकडीवर अनैतिक धंदे करणाऱ्यांचे आयतेच फावते आहे. येथील परिसरात अस्ताव्यस्त टाकण्यात आलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांवरून येथे मद्यप्राशन करण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे, हे स्पष्ट होते. प्रेमीयुगुलांकडून प्रेमाचे चाळेही या टेकडीवर होत आहेत. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT