Vasco traffic rules  Dainik gomantak
गोवा

वास्कोत वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी

वाहतूक पोलिसांनी याविषयी गंभीर होणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

वास्कोत सर्रासपणे वाहन चालकाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. संबंधित विभागाने वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वास्को शहरात मुरगाव नगरपालिकेतर्फे वाहतूक नियमांचे फलक सर्व ठिकाणी लावून सुद्धा काही वाहनचालक मुद्दामून वाहतूक (traffic) नियमांचे उल्लंघन करीत असतात.

वास्को वाहतूक पोलिसांनी (police) संपूर्ण शहरात वाहतुकीचे नियम न पाळणार्‍यावर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम पुन्हा एकदा सुरू करावी. वास्को एफ एल गोम्स मार्गवर दुचाकी पार्किंगमध्ये चार चाकी वाहने, तर चार चाकी पार्किंग मध्ये दुचाकी वाहने पार्क केली जातात. तसेच वास्को स्वतंत्र पथ मार्गावर सुद्धा ही स्थिती असल्याने वाहतूक पोलिसांनी याविषयी गंभीर होणे गरजेचे आहे.

वास्को जुन्या बस स्थानकाजवळ नवेवाडे जाणाऱ्या बसच्या बाजूस दुचाकी, चारचाकी वाहन पार्क करण्यास मनाई असताना तेथे शिक्षित वाहनचालकांकडून वाहने पार्क केली जाते. सदर पार्किंग नसलेल्या जागेत चक्क सरकारी विभागाची वाहने सुद्धा पार्क केली जातात. सध्या वास्कोत वाहतूक पोलीस निरीक्षक पद खाली असल्याने वाहतूक चालकांची मनमानी चालली असल्याची प्रतिक्रिया जनतेकडून होत आहे. राज्य ग्रह विभागाने त्वरित वास्कोत (Vasco) नवीन वाहतूक पोलीस निरीक्षक नेमावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT