Action on illegal massage parlor, nightclub statement by cm pramod sawant Dainik Gomantak
गोवा

बेकायदेशीर मसाज पार्लर, नाईट क्लबवर कारवाई करा: मुख्यमंत्री सावंत

मुख्यमंत्री : अंमलबजावणी न झाल्यास पोलिस निरीक्षक जबाबदार

दैनिक गोमन्तक

शिवोली: गोव्यात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या सर्व मसाज पार्लर, नाईट क्लब आणि डान्सबारवर उद्या सोमवारपासून (ता.६) कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री पोलिस खात्याला दिले आहेत. चंदगड येथील पर्यटकांना मारहाण व लूट तसेच वाढते गुन्हे लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी रविवारी सायंकाळी कळंगुट किनारी जाऊन स्थितीचा आढावा घेतला.

(Action on illegal massage parlor, nightclub statement by cm pramod sawant)

तसेच पोलिसांसह दृष्टीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद केला. त्यांनी पायलट बाईकवरून परिसराची पाहणीही केली. यावेळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, निरीक्षक लक्षी आमोणकर हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत यांनी माध्यमांना सांगितले, ‘की पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यवसाय तसेच काम करणाऱ्या सर्वांची पोलिसांकडून पडताळणी केली जाईल. राज्यात केवळ कायदेशीर स्पा-ब्यूटी पार्लरास मान्यता आहे. त्याव्यतिरिक्त बेकायदा मसाज पार्लर खपवून घेतले जाणार नाही.

अवैधपणे सुरू असलेले नाईट क्लब, डान्सबार यांच्यावर सोमवारपासून कडक कारवाई केली जाईल. आदेशाची योग्य अंमलबजावणी न झाल्यास संबंधित कार्यक्षेत्रातील पोलिस निरीक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई होईल.’

फेरीवाल्यांना हटवणार

कळंगुट, हणजूण, पेडणे यासारख्या किनारी भागांना अतिरिक्त पोलिस स्थानक देण्याची सरकारची तयारी आहे. तसेच किनारी व वाहतूकीसाठी अतिरिक्त पोलिस बळ देण्यास सरकार विचाराधीन आहे. जेणेकरून गोवा हे सुरक्षित पर्यटनस्थळ असल्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहचवला जाईल. शिवाय पुढील हंगामापासून किनाऱ्यांवरील फेरीवाल्यांना हटविले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: वडखळ नाक्याच्या दुरावस्थेविरोधात शेकापचं आंदोलन, मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

Buimpal: भरवस्तीत चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न, हाताचा चावा घेऊन 12 वर्षीय मुलाची सुटका; पोलिसांचा तपास सुरु

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

SCROLL FOR NEXT