Smriti Irani Illegal Restaurant  Dainik Gomantak
गोवा

हॉटेल ‘सिली सोल्स’वर कारवाईचा बडगा शक्य

गटविकास अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश

दैनिक गोमन्तक

पणजी: गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजत असलेल्या आसगाव येथील ‘सिली सोल्स कॅफे बार ॲण्ड रेस्टॉरन्ट’ यावर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश पंचायत संचालिका सिद्धी हळर्णकर यांनी बार्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंबंधीची तक्रार माहिती हक्क कार्यकर्ते ॲड. आयरिश रॉड्रिगीस यांनी पंचायत संचालकांकडे दिली होती. या तक्रारीला अनुसरून संचालिका हळर्णकर यांनी हे निर्देश दिले आहेत.

(Smriti Irani Illegal Restaurant)

माहिती हक्क कार्यकर्ते रॉड्रिगीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसगाव येथील ‘सिली सोल्स कॅफे बार ॲण्ड रेस्टॉरन्ट’ला दिलेला बार परवाना बेकायदेशीर आहे. हे हॉटेल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या संबंधितांचे आहे आणि यासंबंधीची तक्रार अबकारी संचालकांकडे यापूर्वीच दिली आहे. त्यानुसार, त्यांनी संबंधित व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, 29 जुलै रोजी यासंबंधीची सुनावणी होत आहे. तर दुसरीकडे माहिती हक्क अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार हे रेस्टॉरन्ट उभारताना आसगाव पंचायतीकडून कोणत्याच प्रकारचा बांधकाम परवाना घेतलेले नाही. या परवान्याशिवाय हॉटेलमध्ये आणि हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आलेले आहे.

इराणींसमोर अडचणी

कॉंग्रेसकडून माझी बदनामी सुरू आहे. माझी मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे, असे सांगत केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी यासंबंधीचे सर्व आरोप फेटाळून लावत कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांसह इतर दोघांवर न्यायालयात खटला दाखल केला आहे. आता स्थानिक पातळीवर गोव्यात माहिती हक्क कार्यकर्ते ॲड. रॉड्रिगीस यांनी कारवाईसाठी दबाव आणणे सुरू केल्याने इराणी यांच्या समोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT