मडगाव : माडेल - फातोर्डा येथील रस्त्याच्या शेजारी वास्तव्य करून बेकायदेशीरित्या व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीयावर कारवाईचा बडगा उभारून त्यांना आपला गाशा गुंडाळण्यात भाग पाडले आहे . या कारवाईत प्लास्टर ऑफ पेरिसच्या मुर्त्या तयार करणारे कारागीर तसेच खेळणी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांचा समावेश आहे. त्यांची मुलेबाळे असल्याने शनिवार पर्यंत त्यांना आपला गाशा गुंडाळण्याची तंबी मडगाव नगरपालिकेच्या कारवाई पथकाने दिली आहे. (Encroachment in Fatorda News Updates)
परप्रांतियांकडून रस्त्याच्या (Road) शेजारी ताडपत्री आणि प्लॅस्टिकच्या आवरणाने तात्पुरत्या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या तसेच याच ठिकाणी त्यांच्याकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती तयार करण्याचे काम करण्यात येत होते. यातील अनेक कारागिरांचे (Worker) कुटुंब या ठिकाणी वास्तव्य करून राहात होते. त्यांच्याकडून याच ठिकाणी जेवण, नैसर्गिक विधी उघड्यावरच करण्यात येत होते. त्यामुळे येथील परिसरात घाणीचे तसेच दुर्गंधीचे वातावरण निमार्ण झाले होते. मागील कित्येक महिन्यापासून त्यांचे येथे वास्तव्य होते. अशाने या ठिकाणी नगरपालिकेने यापूर्वी का कारवाई केली नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या कारवाई वेळी स्थानिक नगरसेवक फ्रान्सिस जॉनास उपस्थित होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या परप्रांतियांविरुद्ध अनेकांनी तक्रारी केल्या होत्या . तसेच त्यांना या ठिकाणाहून हटविण्याची मागणी केली होती. त्यामुळे या ठिकाणी कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी प्रभाग 10 चे नगरसेवक व्हिटोरीनो हेही उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुर्ती कारागिरांची लहान मुले असल्याने त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी काही अवधी देण्याची मागणी त्यांनी कारवाई पथकाकडे केली. या प्रमाणे शनिवारी येथून आपले बस्तान हटवण्याची तंबी त्यांना मडगाव (Madgaon) नगरपालिकेच्या पथकाकडून देण्यात आली आहे. हे परप्रांतीय दोन तीन महिन्यानंतर पुन्हा या ठिकाणी येत असल्याने कायमस्वरूपी त्यांच्यावर तोडगा काढण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे .
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.