Goa Tourism |Shacks Dainik Gomantak
गोवा

Action on Shacks in Anjuna: हणजूण भागातील 158 शॅक्सवर कारवाई अटळ

‘प्रदूषण’ची संमती नसल्याने खंडपीठाचे निर्देश

दैनिक गोमन्तक डिजिटल

Action Inevitable Against 158 Shacks in Anjuna: कांदोळी-हणजूण किनारपट्टी क्षेत्रात उभारलेल्या 167 शॅक्सपैकी फक्त 9 शॅक्सकडे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती आहे. उर्वरित 158 शॅक्स संमतीविना सुरू आहेत.

त्यामुळे या शॅक्सविरुद्ध कायद्यानुसार कोणती कारवाई करणे शक्य आहे, यासंदर्भातील माहिती द्यावी, असे निर्देश गोवा खंडपीठाने आज राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यटन खात्याला दिले. मंगळवारी याबाबतची सुनावणी पुन्हा सुरू होईल.

राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन खात्याने शॅक्स उभारण्यास परवानगी दिली आहे. यानुसार प्रत्येक शॅक्स चालकाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घ्यायला हवी.

मात्र, कांदोळी-हणजूण परिसरात काही शॅक्स चालकांकडे ही संमती नसल्याचा दावा एका जनहित याचिकेत करण्यात आला होता. यावर खंडपीठाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला यासंदर्भात तपासणी करून त्याचा अहवाल मागितला होता. या तपासणीत बहुतेकांकडे परवानगी नसल्याचे समोर आले.

न्यायालयाने याची गंभीर दखल घेत मंडळ आणि पर्यटन खात्याच्या वकिलांकडे कोणत्या कायद्याखाली या शॅक्स चालकांविरुद्ध कारवाई करणे शक्य आहे, याची माहिती मागितली आहे. त्यामुळे या शॅक्स चालकांविरुद्ध कारवाई अटळ आहे.

स्वेच्छा याचिका

राज्यातील अनेक शॅक्सचालक नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करत आहेत. काही समुद्रकिनाऱ्यांंवर बेकायदा बांधकामे उभी आहेत. त्यासंदर्भात एका प्रकरणाची दखल घेत खंडपीठाने स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: हडफडे दुर्घटनेतील आरोपी लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात! लवकरच भारतात आणण्याची शक्यता

Goa Nightclub Fire: क्लब मालकाकडून 25 लाख रुपयांचा हफ्ता पोहोचत होता, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांचा आरोप

Omkar Elephant: ओंकार हत्तीची दोडामार्गात पुन्हा एन्ट्री; बागायतींचे मोठ्या प्रमाणात केलं नुकसान, कळपात परतण्याची शक्यता

ZP Election: डिचोलीत उमेदवारांचे भवितव्य महिला मतदारांच्या हातामध्‍ये! चारही मतदारसंघात 31 हजार 723 मतदार

Smriti Mandhana: 'जास्त प्रेम करणारे...', स्मृती मंधाना लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच बोलली Watch Video

SCROLL FOR NEXT