Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'त्या' पित्‍याने चोरला ॲसिडचा कॅन! मुलीचे होते ऋषभवर एकतर्फी प्रेम, तपासातून अनेक बाबी समोर

Goa Acid Attack: धारगळ येथे काल ३० जून रोजी ऋषभ शेट्ये (१७) या अल्पवयीन महाविद्यालयीन युवकावर ॲसिड फेकण्याचा जो प्रकार घडला तो एकतर्फी प्रेमातून, असा दावा ऋषभचे वडील उमेश शेट्ये यांनी केला आहे.

Sameer Amunekar

मोरजी: धारगळ येथे काल ३० जून रोजी ऋषभ शेट्ये (१७) या अल्पवयीन महाविद्यालयीन युवकावर ॲसिड फेकण्याचा जो प्रकार घडला तो एकतर्फी प्रेमातून, असा दावा ऋषभचे वडील उमेश शेट्ये यांनी केला आहे. तर, संशयित नीलेश देसाई (४२) हा मुलीचा बाप करासवाडा औद्योगिक वसाहतीत एका गार्डनमध्ये कामाला होता. तेथूनच त्याने पाच लिटरचा ॲसिडचा कॅन चोरून आणला होता, अशी माहिती समोर आली आहे.

करासवाडा येथील औद्योगिक वसाहतीतील एका काच उत्पादन कंपनीत नीलेश हा गेल्या आठ दिवसांपासून गार्डनर म्हणून काम करत होता. तेथूनच त्‍याने पाच लिटर ॲसिड चोरून आणले होते. संशयिताचे हेल्मेट, रेनकोट आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.

संशयित नीलेश देसाई याची मुलगी व जखमी ऋषभ हे दोघेही म्हापसा येथे उच्च माध्यमिक विद्यालयात एकत्रितपणे शिक्षण घेत होते. तेथे त्यांची मैत्री जुळली. मुलीने अनेकदा ऋषभला वेगवेगळे मेसेज पाठविले. एवढेच नव्‍हे तर त्‍याचा पाठलाग करून घरापर्यंत पोचली. त्यावेळी ऋषभच्या आईने तिची चौकशी केली असता ‘मी ऋषभवर प्रेम करते’ असे स्पष्टपणे सांगितले.

परंतु ऋषभने ‘मी हिच्यावर प्रेम करत नाही. ती एकतर्फी प्रेम करते’ असे स्पष्ट केले. ऋषभच्‍या आई-वडिलांनी त्या मुलीची समजूत काढून तिला घरी पाठवून दिले. परंतु अधूनमधून रात्री-अपरात्री ती मुलगी ऋषभला मोबाईलवर वेगवेगळे मेसेज पाठवून जीव देण्‍याची धमकी देत होती. त्याच अनुषंगाने ती मुलगी गोमेकॉत दाखल झाली होती.

ती गोमेकॉत असल्‍याची माहिती त्‍या मुलीची मावशी, जी ओल्ड गोवा पोलिस स्‍थानकात कामाला आहे, तिने आपल्याला दिली, असे ऋषभचे वडील उमेश शेट्ये यांनी पोलिसांना सांगितले. त्या मुलीची आम्ही गोमेकॉत जाऊन भेट घेतली. पण ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती. त्यावेळी तिचे वडील नीलेश देसाई यांनी ‘तुम्ही घाबरू नका, तुमची काही चूक नाही’ असे सांगितले होते. त्यानंतर आठच दिवसांत त्या मुलीचा मृत्‍यू झाला, असेही शेट्ये म्‍हणाले.

परंतु त्‍या मुलीच्‍या मृत्‍यूनंतर तिच्‍या वडिलाने आणि मावशीने सिंधुदुर्ग पोलिसांत आमच्याविरोधात तक्रार दाखल केली. नंतर ती तक्रार मोपा पोलिस स्टेशनवर देण्यात आली. आम्ही पोलिसांना त्‍या मुलीने पाठविलेले सर्व मेसेज तसेच अन्‍य सर्व पुरावे सादर केले.

संशयिताने ॲसिड हल्ला करण्‍यापूर्वी कटकारस्थान रचल्याचा दावा शेट्ये यांनी करून या प्रकरणात मुलीच्‍या मावशीचाही हात असू शकतो, असे सांगितले. त्‍या मुलीचा मृत्‍यू कावीळ झाल्‍याने झाल्‍याचा अहवाल गोमेकॉतून पोलिसांना सादर केल्याचा दावा शेट्ये यांनी केला. त्यामुळे तिच्या मृत्यूशी आमचा काहीच संबंध नाही असे ते म्‍हणाले.

जखमी युवक अजूनही व्हेंटिलेटरवर

जखमी ऋषभ उमेश शेट्ये या युवकावर गोमेकॉतील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. चेहऱ्याला आणि डोळ्‍याला गंभीर दुखापत झाल्‍याने त्‍याला व्हेंटिलेटरवर ठेवण्‍यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असली तरी त्याला सध्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी दिली.

ऋषभला काल गंभीर अवस्थेत गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. त्याचा चेहरा, डोळा व शरीराचा काही भाग ॲसिड हल्‍ल्‍यात भाजला आहे. डॉक्टरांचे पथक त्‍याच्‍या प्रकृतीवर नजर ठेवून आहे. पुढील दोन दिवसांत त्याच्या प्रकृतीसंदर्भात चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT