ACGL Company Dainik Gomantak
गोवा

संप मोडून काढण्यासाठी ACGL कंपनीची व्युहरचना

कामगार उद्या पासून पाच दिवस संपावर, कंत्राटदार आणि कामगार संघर्ष होण्याची शक्यता

Dainik Gomantak

पिसुर्ले: गेल्या साडेतीन वर्षांपासून होंडा भुईपाल परीसरात असलेल्या एसीजीएल कंपनी (ACGL Company) कामगार संघटनेचे वतीने कंपनी व्यवस्थापनाकडे सादर केलेल्या पगार वाढ कराराचा तीढा सुटत नसल्याने शेवटी कामगारांनी कायदेशीर मार्गांचा अवलंब करून कंपनीला सुमारे 15 दिवसांपूर्वी संपाची नोटीस दिली होती, त्यानुसार उद्या दि 18 ते 22 रोजी पर्यंत कंपनीच्या दोन्ही विभागांतील कामगार संपावर जाणार आहेत (ACGL workers strike) , मात्र नोटीस दिल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने कोणताच तोडगा न काढता, वरून कंपनीच्या दोन्ही विभागांत काम करणाऱ्या कंत्राटदारांना कामावर येण्याची ताकिद देऊन सदर संप मोडीत काढण्याची व्युहरचना आखली असल्याची खात्री लायक माहिती हाती आली आहे.

या भागाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या दुरदृष्टी कोनातून सुमारे 32 वर्षांपूर्वी येथे एसीजीएल कंपनीची स्थापना झाली होती, त्यामुळे सत्तरी तालुक्या बरोबर राज्यातील इतर भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या, त्यामुळे एसीजीएल कंपनी ही सत्तरीच्या विकासातील एक महत्त्वाचा घटक असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या कंपनीतर्फे निर्माण होणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बसेस मुळे होंडा, भुईपाल या बरोबरच बस उत्पादनातील एक उत्कृष्ट कंपनी म्हणून गोव्याचे नाव सुद्धा देशात तसेच देशाबाहेर पोचले होते. परंतु कंपनीच्या बदलेल्या व्यवस्थापन धोरणामुळे कामगारांनी सादर केलेल्या पागार वाढीचा मुद्दा कंपनीने फेटाळून वाढत्या महागाईच्या काळात कमी पागार वाढ देण्याचा निर्णय घेतल्याने सुमारे साडेतीन वर्षे कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यामध्ये चाललेला वाटाघाटीचा मुद्दा संपुष्टात आल्याने कामगारांना नाइलाजाने संपाचे हत्यार उभारावे लागलें असे कंपनीच्या दोन्ही कामगार संघटनेने या संपाचे समर्थन करताना स्पष्ट केले आहे. या संबंधी उद्याच्या संपाची कशी काय रणनीती असणार आहे हे समजू शकले नसले तरी पाच दिवस सदर संप यशस्वी करण्यासाठी कामगार संघटनेच्या वतीने जय्यत तयारी केली असल्याची माहिती मिळाली आहे.

कंत्राटदारांची इकडे विहीर तिकडे आड अशी अवस्था

सदर कंपनीत कायमस्वरूपी कामगारां बरोबर शेकडो कामगार कंत्राटदारां मार्फत काम करीत आहेत, त्याच प्रमाणे या कंपनीला सुट्या भागांचा पुरवठा करण्यासाठी होंडा औद्योगिक वसाहतीत बरेच लघुउद्योजक आहेत, त्याच प्रमाणे कंपनीच्या दोन्ही विभागांत कंपनीचे स्टाफ कामगार आहेत. त्यामुळे उद्या पासून सुरू होणाऱ्या कामगार संघटनेच्या संपाची झळ त्या कामगारांना बसण्याची शक्यता आहे. त्यात कामगार संघटनेच्या वतीने कंत्राटदारांना संपाच्या सहकार्य करण्याची विनंती केली असल्याची माहिती मिळाली असून या उलट कंपनी व्यवस्थापनाने कंपनीची सुरक्षा वाढवण्या बरोबर कंत्राटदारांशी संपर्क साधून सर्व कंत्राटी कामगारांना कामावर पाठवण्याचे फर्मान सोडले आहे, अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल व वेळ पडल्यास कंपनी बंद सुद्धा केली जाईल, असा धमकी वजा इशारा दिला असल्याची खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजले आहे. त्यामुळे सद्या या संपाच्या काळात कंत्राटदार वर्ग कचाट्यात सापडला आहे.

राज ठाकरे यांच्या मनसे कामगार संघटनेचे ACGL कामगार संघटनेला लाभणार मार्गदर्शन

दरम्यान उद्या पासून सुरू होणाऱ्या संपाच्या काळात या भागातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने पोलिस यंत्रणेने सुद्धा सतर्क राहण्याची गरज आहे, त्यात या संपात महाराष्ट्रातील कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव अग्रेसर राहीलेल्या राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेचे मार्गदर्शन एसीजीएल कामगार संघटनेला लाभणार असल्याने या संपाला पुढे कसे काय वळण लागते, यांची उत्सुकता या भागातील नागरिकांना लागून राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT