गोवा फॉरवर्ड पक्षाने 'भंडारी समाजाचा मुद्दा' विधानसभेत मांडावा

गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर यांना गोमंतक भंडारी समाजाची विनंती
गोमंतक भंडारी समाजाने गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर यांची भेट घेतली.
गोमंतक भंडारी समाजाने गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर यांची भेट घेतली. दैनिक गोमन्तक
Published on: 
Updated on: 

Goa: गोमंतक भंडारी समाजाने (Gomantak Bhandari Samaj) गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर (Goa Forward MLA Jayesh Salgaonkar) यांना विनंती केली आहे की, आगामी विधानसभा अधिवेशनादरम्यान (Assembly session) भंडारी समाजासाठी आरक्षणातील ठरावीक हिस्सा देण्यासंदर्भातील मुद्दा उपस्थित करावा. भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक (Bhandari Samaj President Ashok Naik) यांच्यासह उपाध्यक्ष देवानंद नाईक आणि कार्यकारिणी सदस्य प्रकाश कळंगुटकर यांनी गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर यांची भेट घेऊन त्यांना हा मुद्दा उपस्थित करण्याची विनंती केली.

गोमंतक भंडारी समाजाने गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर यांची भेट घेतली.
ॲड. आयरिश‍ रॉड्रिग्ज पणजीतून निवडणूक लढविणार

नाईक यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सर्वेक्षणानुसार नाईक भंडारी समाजाची लोकसंख्या 40% पेक्षा जास्त आहे. नाईक यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या इतर मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षणाचा कोटा हा दुर्बल घटकांच्या उत्थानाच्या दृष्टीने एक महान धोरणात्मक निर्णय आहे. तथापि, जेव्हा सरकारी सेवेतील पदांचा विचार केला जातो, तेव्हा भंडारी समाजाला पाहिजे तेव्हढा न्याय मिळत नाही, कारण 27% ओबीसी श्रेणींमध्ये 18 वेगवेगळ्या समुदायांचा समावेश आहे.

"हे नमूद करणे उचित आहे की नाईक भंडारी समाजाची लोकसंख्येच्या राज्यात 40% आहे. मात्र त्यांना फार कमी किंवा कधीकधी त्यांच्या बाजूने आरक्षण मिळत नाही." असे निवेदनात म्हटले आहे. “वरील बाबी लक्षात घेता, ओबीसी समुदायाशी संबंधित आरक्षण धोरणाची पुनरावलोकन / निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, जे सर्वात मागास आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गोव्यातील नाईक भंडारी समुदायासाठी आरक्षणाची योग्य टक्केवारी वाढवून नव्याने निर्णय घेवू शकतो.

गोमंतक भंडारी समाजाने गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर यांची भेट घेतली.
अन्याय फक्त हिंदूंवरच केला जातो: बजरंग दल

शिवाय, इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचे उप-वर्गीकरण करण्यासाठी आणि इतर मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षणामध्ये नाईक भंडारी समुदायासाठी महत्त्वपूर्ण टक्केवारी राखून ठेवण्यासाठी आरक्षण धोरणात सुधारणा करणे आवश्यक आहे.’’ असे त्यात पुढे म्हटले आहे. साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांनी भंडारी समाजाच्या नेत्यांना आश्वासन दिले आहे की गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई या प्रकरणी लक्ष घालतील आणि त्यांचा पक्ष विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com