ॲड. आयरिश‍ रॉड्रिग्ज पणजीतून निवडणूक लढविणार

स्वयंसेवक बनून लोकांच्या कल्याणासाठी काम करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर
Adv Aires Rodrigues
Adv Aires RodriguesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Election 2022: माहिती हक्क कायकर्ते व वकील असलेल्या आयरिश रॉड्रिग्ज (Adv Aires Rodrigues) यांनी पणजी मतदारसंघातून (Panaji Constituency) आगामी विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election 2022) लढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून माझे अनेक हितचिंतक व मित्रमंडळींनी निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता. ज्येष्ठ नागरिक झाल्याने निवडणूक लढविण्याबाबत संकोचित होतो मात्र स्वयंसेवक बनून लोकांच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती ॲड. रॉड्रिग्ज यांनी दिली.

Adv Aires Rodrigues
अन्याय फक्त हिंदूंवरच केला जातो: बजरंग दल

माझी दोन स्वप्न होती त्यापैकी यशस्वी वकील होण्याचे स्वप्न पुरे झाले आहे तर आमदार होण्याचे असलेले दुसरे स्वप्न लोकांची सेवा करण्याचे होते. त्यामुळे ते सुद्धा पूर्ण होईल असा ठाम विश्‍वास आहे. पणजी मतदारसंघात समर्पित मित्र आणि हितचिंतकांचे खूप जवळचे निष्ठावंत नेटवर्क असल्याने मी आमदार म्हणून निवडून येऊ शकतो. लोकांच्या कल्याणासाठी विधानसभेत आवाज उठवता यावे यासाठी हे एकमेव व्यासपीठ आहे. लवकरच मी माझ्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. पणजी मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत मी वैयक्तिकरित्या भेट देणार आहे व त्यांचे आशिर्वाद, पाठिंबा, सल्ला व मार्गदर्शन घेणार असल्याचे ते म्हणाले.

Adv Aires Rodrigues
हॉस्पिटलच्या मल्टी टास्किंग स्टाफला कायम करण्याची गरज: मंत्री माविन गुदीनो

पणजी मतदारसंघातील प्रचाराची फळी तयार करण्यासआठी मी सर्व ३० बूथसाठी कमिट्या स्थापन करण्याचे काम सुरू केले आहे. या कमिटीमध्ये निष्कंलक तसेच प्रामाणिक लोकांचा समावेश असेल. लोकांना चांगली सेवा देण्याचा माझा उद्देश आहे. यापूर्वी मी नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवित आलो आहे. आताही लोकांच्या सेवेसाठीच निवडणूक लढवत आहे. लोकांकडून सल्ल्याची गरज आहे व ते लोकांनी मुक्तपणे द्यावेत अशी अपेक्षा आहे असे ॲड. रॉड्रिग्ज म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com