Panipat-Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

पानिपत येथे गोळीबार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला गोव्यात अटक, अडीच वर्षांपासून होता फरार

2020 साली झालेल्या खुनी हल्ला आणि खुनाच्या गुन्ह्यात पोलिस आरोपीचा शोध घेत होते.

Pramod Yadav

Panipat-Goa Crime News: पानिपत येथे दारूच्या ठेकेदारावर गोळीबार करून क्रॉस फायरिंगमध्ये तरुणाची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपी मागील अडीच वर्षांपासून फरार होता व त्याच्यावर पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

2020 साली झालेल्या खुनी हल्ला आणि खुनाच्या गुन्ह्यात पोलिस आरोपीचा शोध घेत होते. मंगळवारी त्याला उत्तर गोव्यातील एका रेस्टॉरंटमधून अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपी योगेश (रा. लखू बुआना) याला गोव्यातून अटक केली आहे. या प्रकरणात गुंड प्रसन्ना उर्फ ​​लंबूसह 15 दोषींना मे 2022 मध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे.

घटनेनंतर आरोपी गोव्यासह विविध ठिकाणी लपून फरार झाला होता. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपी योगेशने 2020 मध्ये दारू ठेकेदार सुरेंद्र आणि अजित यांच्यावर गोळीबार केला होता. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता.

आरोपी योगेश गोव्यात लपून बसल्याची विशेष माहिती पोलिसांच्या एका टीमला मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ माहितीची शहानिशा केली व पोलिसांचे पथक विमानाने गोव्यात दाखल झाले.

आरोपी योगेशला मंगळवारी उत्तर गोव्यातील एका रेस्टॉरंटमधून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपीने त्याचा मोठा भाऊ राकेश उर्फ ​​राकू आणि त्याच्या डझनहून अधिक सहआरोपींनी ही घटना घडवून आणल्याची कबुली दिली. घटनेनंतर तो गोव्यात विविध ठिकाणी लपला होता.

राकेश उर्फ ​​राकू आणि प्रसन्ना उर्फ ​​लंबू आणि इतरांविरुद्ध सेक्टर 13-17 पोलीस ठाण्यात हत्येसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी प्रसन्ना उर्फ ​​लंबू, शोएब, विशाल, राजेंद्र उर्फ ​​राजा, शील कुमार आणि राकेश उर्फ ​​राकू यांना प्रत्येकी 14 वर्षांची तर,

जसविंदर उर्फ ​​जस्सी, विकास, आंचल, प्रदीप कुमार, नवीन उर्फ ​​भोलू, जगदीप उर्फ ​​जग्गा आणि अमित यांना जन्मठेपेची, अनिल उर्फ ​​काळे शाह आणि विक्रम उर्फ ​​कुक्कू यांना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT