Accused Shahabuddin Sheikh escapes from Bambolim Psychiatric Hospital Dainik Gomantak
गोवा

बांबोळी मनोरुग्ण इस्पितळातून आरोपी शहाबुद्दिन शेखचे पलायन

आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शहाबुद्दिन शेख हा कोलवाळ येथील तुरुंगात होता.

Priyanka Deshmukh

पणजी: आज पहाटे साडेपाचच्या सुमारास बांबोळी येथील मनोरुग्ण इस्पितळाच्या (IPHB) शौचालय खिडकीतून आरोपी शहाबुद्दिन शेख (23) याने पलायन केले. याप्रकरणी आगशी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती दिली. विविध भागातील वाहन चोरीप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.

आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शहाबुद्दिन शेख हा कोलवाळ येथील तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वी त्याला मनोरुग्‍ण इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज पहाटेच्या सुमारास तो इस्पितळातील शौचालयात गेला. खूप वेळ झाला तरी शौचालयाचे दार बंद असल्याने इस्पितळातील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी दार ठोठावले असता आतून आवाज येत नव्हता. त्यामुळे या शौचालयाच्या मागील बाजूने जाऊन पाहिले असता आतमध्ये कोणीही नव्हते. या खिडकीतून शहाबुद्दिन शेख याने पलायन केल्याचे लक्षात येताच त्याची माहिती पोलिसांनी देण्यात आली.

आरोपी शहाबुद्दिन शेख हा वास्को येथील असून त्याला अनेक वाहन चोरीप्रकरणात अटक झाली आहे. काही प्रकरणात त्याने चोरीची कबुली दिल्याने न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे तर काही प्रकरणांवरील खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. काही दिवसांपासून मानसिक संतुलन बिघडल्याने त्याला उपचारासाठी दाखल केले होते. या मनोरुग्ण इस्पितळात सुरक्षारक्षक आहेत मात्र आवारातच सुरक्षा नसल्याचा फायदा उठवून तो पसार झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT