पणजीत नरकासुराचे राज्य

एक नरकासुर आणि पाच बॅनर अशी सध्या गोव्यात दिवाळीची स्पर्धा सुरू आहे.
पणजीत नरकासुराचे राज्य
पणजीत नरकासुराचे राज्यDainik Gomantak
Published on
Updated on

पणजीत नरकासुराचे राज्य

नरकासुरांचे दिवाळीमध्ये प्राबल्य वाढणे हे काही राज्याच्या आरोग्याच्यादृष्टीने ठिक झाले नाही. त्यात आवाजाचे प्रदूषण. पणजी शहरातच सगळ्याच नरकासुरवाल्यांनी कर्कशऽऽऽ आवाजात म्युझिक लावून राज्यात ध्वनीप्रदूषण करून टाकले. महत्त्वाचे म्हणजे या एकाही सिस्टीमवर भक्तीगीते किंवा पौराणिक गीते वाजवली नाहीत. अमलीपदार्थांच्या रेव्ह पार्ट्यांमध्ये ‘गोवाट्रान्स’ म्हणून जे कर्णकर्कशऽऽऽ संगीत वाजवले जाते, त्याचाच गोंगाट पणजीत चालला होता आणि वेगळे सांगायची गरज नाही. हे सगळे बाबूश मोन्सेरात यांच्या कृपेने चालले होते. करोडो रुपये खर्च करून पणजीकरांच्या उरावर बसणारा हा नरकासुर उत्सव राजधानीतील रहिवासीयांना मुकाटपणे सहन करावा लागला. त्यात वृद्धांची प्रचंड गैरसोय झाली. दुर्देवाने ते तक्रार कुणाकडे करणार? पोलिस आणि राजकीय नेते यांचे संगनमत झाल्यावर नागरिकांची अडचण होणारच. पणजीमध्ये अक्षरशः सरकार अंतर्धान पावले होते. ∙∙∙

कळंगुटमध्येही भाजपचे असंतुष्ट!

अन्य भागांप्रमाणेच कळंगूट मतदारसंघात भाजपमध्ये अल्पसंतुष्ट अथवा अल्पसंतुष्ट आहेत, हे आता उपडपणे दिसून आले आहेत. या पूर्वी मायकल लोबो यांच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले, तसेच जनमासावर बऱ्यापैकी प्रभाव असलेले सुदेश मयेकर, सुदेश शिरोडकर आणि गुरुदास शिरोडकर असे भाजपचे प्रमुख तीन स्थानिक नेते तर उघडपणे लोबो यांच्या विरोधात उघडपणे बोलत आहेत. त्यापैकी सुदेश मयेकर यांनी तर ‘आप’मध्ये प्रवेश केला आहे. या मतदारसंघात संप्रदायिकांची मोठी वोट बँक असून तो दबाव गटही लोबो यांच्या विरोधात असल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे लोबो यांना यापुढे भाजपची उमेदवारी मिळाली तर त्यांना काही स्थानिक नेते भाजपमध्ये आयात करावेच लागतील, असे वाटते. सध्या लोबो काँग्रेसमध्ये अथवा आपमध्ये जाऊ शकतात, अशाही वावड्या पसरलेल्या आहेत. ∙∙∙

पणजीत नरकासुराचे राज्य
गोव्याचा प्रसिद्ध नरकासुर पूर्णत्वाकडे...; पाहा व्हिडिओ

नरकासुराचे बॅनर युद्ध

एक नरकासुर आणि पाच बॅनर अशी सध्या गोव्यात दिवाळीची स्पर्धा सुरू आहे. राजकारण्यांनी बॅनर लावण्यासाठी एकही जागा शिल्लक ठेवलेली नाही. त्यामुळे सुंदर गोव्याचे संपूर्ण विद्रुपीकरण - नरकासुरांबरोबरच बॅनरनेही करून टाकले आहे. विशेषतः तिसवाडी आणि बार्देश तालुक्याचा बॅनरयुद्धात कुणी हात धरू शकणार नाही. त्यात बाबूश मोन्सेरात आणि मायकल लोबो यांनी आघाडी घेतली आहे. मालीम जेटीवर तर जवळ जवळ १०० नरकासुर उभे ठाकले आहेत. संपूर्ण गोव्यात सगळ्याच राजकीय नेत्यांनी प्रचंड खर्च करून नरकासुरही प्रायोजित केले. त्यावरच जवळजवळ २५ कोटी रुपयांचा चुराडा झाला असल्याची शक्यता निरीक्षक व्यक्त करतात. हा पैसा जर गरीबांना मदत करण्यासाठी आणि निराधारांच्या झोपड्यांमध्ये गोड-धोड पोहचवण्यासाठी नेत्यांनी वापरला असता, तर गावकुसाबाहेर निश्चितच दिवाळी आनंदात साजरी झाली असती...∙∙∙

पणजीत नरकासुराचे राज्य
गोव्यात नरकासुर दहनावर पावसाचे पाणी

भाजपला हवी कॉंग्रेस

गेला पंधरवडा कोणत्याही भाजप नेत्याला विचारा ते म्हणतात, गोव्यात भाजपा आणि कॉंग्रेस अशीच टक्कर होणार आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते ‘सुकाणू’ समितीचे सदस्य छातीठोकपणे हेच सांगू लागले आहेत. याचा अर्थ काय? राजकीय निरीक्षक म्हणतात, भाजप नेते - जे पूर्वी ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ असा नारा लगावत होते ते आता एकाच निष्कर्षावर आले आहेत - ‘कॉंग्रेस परवडली, परंतु आम आदमी पक्ष किंवा तृणमूल नको’. त्यांच्या सांगण्याचा मतितार्थ असा - ‘कॉंग्रेस पक्ष सहज मॅनेज केला जाऊ शकतो, परंतु आप किंवा तृणमूल नाही.’ राजकीय निरीक्षक म्हणतात की, ‘कॉंग्रेस भाजपाला अजूनपर्यंत हरवू शकलेली नाही. तर आप किंवा तृणमूल भाजपच्या डोळ्यात डोळा घालून त्यांना पराभूत करू शकते. दुसरे म्हणजे कॉंग्रेस नेत्यांना काही हाडके टाकली तर प्रश्न संपतो. त्याचमुळे असेल भाजप नेत्यांना नवीन साक्षात्कार झाला आहे. त्यांची लढाई आहे केवळ कॉंग्रेसशी.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com