According to survey Goa is happiest state in country  Dainik Gomantak
गोवा

आमचे गोंय देशान सगळ्यात आनंदी राज्य

गोवा राज्य नेहमीच फन, फूड आणि नेचर साठी पर्यटकांच्या आवडीच ठिकाण ठरले आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा राज्य (Goa State) नेहमीच फन, फूड आणि नेचर साठी पर्यटकांच्या (Tourism) आवडीच ठिकाण ठरले आहे. अशातच ‘इंडिया टुडे’तर्फे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात लहान राज्यांच्या यादीमध्ये ‘आनंद’या संकल्पनेत गोवा राज्याने (happiest state) बाजी मारली आहे. आणि राज्याला सर्वात आनंद राज्याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. लहान राज्यांच्या यादीमध्ये गोवा राज्य सर्वात जास्त आनंदी असल्याचे सर्वेक्षणात (survey) नमूद करण्यात आले आहे. (According to survey Goa is happiest state in country)

गोव्यातील शिक्षण, साधनसुविधा, स्वच्छता या बाबतीत गोवा आनंदी असल्याचे सर्वेक्षण अहवालात दिसून आले आहे. तसेच पर्यटन क्षेत्रातही गोवा सर्वाधिक आनंदी असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. लहान राज्यातील यादीमध्ये आनंदी निर्देशांकानुसार गोवा राज्य अव्वल ठरल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.

ग्लोबल हॅपिनेस कौन्सिलतर्फे राष्ट्रीय स्तरावर हा अहवाल प्रकाशित करण्यात येतो. त्यात विविध राज्यांची विविध क्षेत्रातील आनंदाबाबतची सद्यस्थिती काय आहे याचे सर्वेक्षण केले जाते. यावर्षी इंडिया टुडेतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्वेक्षणात गोव्याला अव्वल मानांकन मिळाले आहे.

गोवा राज्याला गेल्या काही वर्षात अशा प्रकारचे पुरस्कार लाभले असून लहान राज्य असल्याने या सगळ्या पुरस्काराचा आणि नामांकनांचा लाभ गोव्याला मिळतो आहे. या मानांकनामुळे गोव्याचे देशभरात कौतुक होत असल्याने गोमंतकीय शासन प्रशासन आनंदी असल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT