लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात फिजिकलमधून (Physical) डिजिटलमध्ये रूपांतर कधी झाले, हे कळलेच नाही. बदल स्वीकारणे परिस्थिती, वातावरण शिकवते. न कुरकूर करता निसर्गाचा (Nature) कोप सर्वांनी झेलला. तोच बदल, तर घडवून आणायचा झाला की ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ येतात, विचारवंत आपले विचार मांडतात. थिल्लर खिल्ली उडवतात. गमावणे, कमावणे या पलीकडे आपण सुख-दुःख वाटू शकतो असा कोपरा व्हॉटस् ॲप (WhatsApp) , फेसबुकद्वारे (Facebook) डिजिटल (Digital) उपलब्ध झाला. बौद्धिक देवाणघेवाण झाल्यामुळे डिजिटल (Digital) देवदूत नाचू लागला.
डिजिटलचे (Digital) साम्राज्य घराघरांतून ठाण मांडून बसले. डिजिटलचा (Digital)विकास दोन वर्षांत फोफावला, जणूकाही हा शरीराचा अवयव झाला. तमा न बाळगता डिजिटलमुळे विचार वृद्धिंगत व्हायला लागले. इतके अंगवळणी पडलेय की फिजिकली एकमेकांना भेटले. मित्रमंडळी तरी नेटकऱ्यांची भाषा बोलतात. मी पाहिलं होतं तुला ऑनलाईन. चॅट शेअर (Share) केला (खाऊ आहे का तो), दिसला नाही हल्ली ऑनलाईन (Online) ...... कमेंटबद्दल बोलणंच नको. त्यावर रागरुसवा, विश केले नाही केले, उत्तर नाही दिले. स्वतःलाच फिजिकल असून डिजिटल (Digital) करून घेतले.
डिजिटल काळाची गरज होती त्यामुळे तो फोनही सतत आधारस्तंभ करत सोबत असे ‘टूक’ झाला की मोबाईलमध्ये (Mobile) महायुध्द आहे की काय चाललंय ह्यासाठी पटकन उघडून वाचावंसं वाटायचं, मग हे अंगवळणी पडले. कुठल्या पोस्टला जास्त- कमी लाईक (Likes) मिळतात हे पाहाण्याचा माझा अंदाज चुकत होता. मला वाटणाऱ्या ‘फुटकळ’ पोस्टलाच(Post) जास्त महत्त्व मिळते असे दिसून आले. दुसऱ्याचे पाय ओढण्याची घाई, पाणचट विनोद, सतत कमेंट करणाऱ्या ठराविक व्यक्तींची आताशी यादी तयार झाली. दोन वर्षांच्या डिजिटल (Digital) युगाच्या प्रदीर्घ काळात मी डिजिटलची (Digital) पदवी पटकावल्याचा आनंद सुखावायला लागला. विद्यार्थी (Student) आणि शिक्षक (Teacher) तसंच नातं निर्माण झालं. नेटकऱ्यांनी उघडलेले रंग, भाषाशैली, विचारांची उधळण, त्यांचे झुकते माप, उथळपणा, अभ्यासाची खोली सर्वांच्या मोजमापाची पट्टी पाहता नेटकरी कुठल्या प्रकारात मोडतात ह्याची मी यादी तयार केली.
भक्त कुठल्याही पक्षावर प्रेम करणारे, कुणी चुकतंय तर सुधारणारे हे सुधारक भलीमोठी विकासाची यादी जोडायची, जणूकाही आपणच तीर मारलाय. समोरचा विरोध करतो हे दिसताच हाताची बोटे शिवशिवत सर्वेक्षण पार पडले. मूर्तिमंत भीती उभी राहिली. गुरूची विद्या गुरूला भोवली असे तर नाही होणार येणाऱ्या काळात. नेटकरी सर्वच नाही, परंतु काही जण लाचार, तत्त्वहीन का होतात. कार्य, काम कुठलेही लहान नाही. विचार विकले की कीव करावीशी वाटते. कुणाला ब्लॉक करा, तो दुसऱ्या नावाने प्रकट होतो. भरवसा कुणाचा नाही. त्यामुळे वृद्धी होत नाही. ठराविक लोकांचा मेसेज (Message) वाचावासादेखील वाटत नाही. सतत कुत्सितपणा अर्थात त्यांच्याकडून अपेक्षितच नसतो चांगुलपणा. मिंधेपणा जाहीरपणे मांडतात. जात, धर्म, पंथ, संस्कार कमरेचे सोडून टाकल्यागत लिहितात. शब्दांचा नंगानाच करून आपणच उघडे पडतात. नेटकऱ्यांनो तुम्ही वस्तू नाही आहात. नाही कुणाची मालमत्ता. स्वतःचा स्वाभिमान सांभाळा. ह्यात तुमचाच आलेख घटतोय. तुमचा मेसेज डिलीट(Delete) करायला सोपा आहे. तो उपाय आहे. त्यात तुम्ही दुसऱ्यांच्या नजरेतून उतरताय. आपलं वर्तन पुढल्या काळात घातक ठरणार आहे. खुनशी स्वभाव कधीतरी डिजिटलमधून फिजिकल (Physical) व्हायला वेळ लागणार नाही. स्वतःवर निर्बंध घाला.
ठेवून मतपरिवर्तनाचा ठेका त्यांच्यावरच आहे ते दाखवून द्यायचे. भले ते ज्ञान अर्धवट असो. उदाहरणार्थ इफ्फीत (IFFI) फोटोग्राफरना उद्गघाटन समारंभात प्रवेश नाकारला. झालं दुसऱ्या दिवशी फोटो इफ्फीचे आले. कॅमेरा (Camera) जमिनीवर असताना हे फोटो(Photo) आले कुठून. भाऊ, लाल करा पण अज्ञान पाजळू नका. माहिती आणि प्रसिध्दी खाते सरकारकडे आहे. बातमी येणे अनिवार्य आहे. छापावी लागणार. त्यातून जाहिरात, अर्थव्यवस्था तसेच अनेक गोष्टी अवलंबून असतात. उचलली जीभ लावली टाळ्याला. नेटकऱ्यांना (Users) प्राथमिक शिक्षण देणे गरजेचे आहे. असो, गाढवापुढे वाचली गीता. दुसरा प्रकार गुड नेटकरी ते सल्ले देतात. खोटी माहिती टाकणे, स्वतःला आय.टी. टीम समजत स्वतःचे नाव न लिहिता वापरता, कुणाच्यातरी नावाने फेक आय.डी. वरून बाण सोडत असतात. प्रोफाईलमध्ये (Profile) जाल तर तिथे क्वालिफिकेशन आय.टी दाखवतात. हे व्यापारी खरे. पैसा फेको तमाशा देखो. ते आपल्याखाली खोगीर मते विकून माणसांना निवडून त्याठिकाणी बसवतात. हातात मोबाईल (Mobile) ठराविक कमेंट, बुरसट लेखणी, पोटभरून घाणेरडे शब्दांचा साठा, मानसिक रुग्ण ज्यांना आपला विचार प्रगट करताना कुणाचातरी आधार लागतो ते भाड्याने नेटकरी नेटकऱ्यांचे पोट भरतात. दुर्दैवी डबक्याची वृत्ती. दोष कुणाचा?
नेटकऱ्यांचा (users) ग्रुपच (Group) असतो. स्वतः कमावलेले नसते. मिळाला मुद्दा घाला. त्यात लाईकवाले (Likes) सांभाळून लाईक करतात. प्रकरण आपल्यावर शेकणार नाही ना ह्याचा सारासार विचार होतो. ‘वापरून घेणे’ हे ह्या प्रकारच्या नेटकऱ्यात अवगत असत. शेवटच्या नेटकऱ्याची खासियत कुणाचीच पाठ सोडायची नाही. अगदी खाजगी जीवनसुद्धा पणाला लावायचे. त्यावेळी समोरचा शहाणा पोलिस स्थानक गाठतो. ‘सायबर क्राईम’ (Cyber crime) 'गोंडस नाव. तिथे न्याय मिळेल अशी अपेक्षा की उपेक्षा माहिती नाही. विद्यार्थी शाळेत बडबड करतो त्यावेळी शिक्षक त्याला कागदावर लिहायला सांगतात, ‘मी यापुढे बोलणार नाही.’ लिही शंभरदा. तिथेही हीच परिस्थिती. तो/ती पोलिस स्थानकावर पांढऱ्यावर काळं करतो. तोंड काळं झालं म्हणून डबल ताकदीने ईर्षा, द्वेष टोपण नावाने काढतो. अडाणी परवडले, पण हे निलाजरे नको. ये रे माझ्या मागल्या...
- नीना नाईक, पणजी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.