Velus Accident Dainik Gomantak
गोवा

Velus Accident: वेळूस मार्गावर रस्त्याच्या अंदाज येत असल्याने वारंवार अपघात; रुंदीकरणाची मागणी

वेळूस येथे वाळपई ठाणे मार्गावर पुढून येणाऱ्या रस्त्यावरील वाहनांचा अंदाज येत असल्याने वारंवार अपघात होत आहे.

दैनिक गोमन्तक

Velus Accident: वेळूस येथे वाळपई ठाणे मार्गावर समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे या अपघाताला आळा बसण्यासाठी हा रस्ता रुंद करण्याची मागणी येथील स्थानिक करत आहेत.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, वेळूसरस्ता हा मुख्य असून या मार्गावर लोकांची व वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सदर मार्गावर असलेल्या वळणावर पुढील येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत आहे. तसेच वाहन चालवताना जीव मुठीत धरुन वाहन चालवावे लागत आहे.

यामार्गावर अनेक वेळा पुढील वाहनांचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहे. काही वर्षांपूर्वी या मार्गावर बस व मोटरसायकल यामध्ये अपघात होऊन तरुणांचा जीव गेला होता.

तर काही दिवसांपूर्वी मोटर सायकल व कारमध्ये अपघात होऊन एका युवकाला जबर दुखापत झाली होती. त्यामुळे या वळणावरची रुंदी वाढवण्याची आवश्यकता आहे. तरच याठिकाणी होणाऱ्या अपघाताला आळा बसेल, असे सांगण्यात येत आहे.

यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना स्थानिक नगरसेवक रामदास शिरोडकर म्हणाले, आपण यासंबंधीत रस्ता रुंद करण्यासंबंधी रस्त्याच्या बाजूला असलेल्या जमिनीच्या मालकाकडे रुंदीकरण करण्यासाबंधी विचारणा केली आहे. त्यामुळे लवकरच सर्व सोपस्कार पूर्ण करुन याचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT