धारगळ-मोपा मार्गावर सुके कुळण येथे रस्ते बांधकामासाठीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे.
तर दुचाकीच्या मागे बसलेला आणखी एक जण जखमी झाला आहे. धारगळ-मोपा मार्गावर सुके कुळण येथे हा अपघात झाला.
नामदेव नारायण कांबळी (63 वर्षे) असे मृताचे नाव आहे. तर काशिनाथ तुकाराम शेट्ये (64 वर्षे) हे जखमी झाले आहेत. हे दोघेही मूळचे म्हापसा येथील आहेत.
या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने येथे फ्लायओव्हरच्या बांधकामात वापरली जात असलेल्या दोन क्रेन पेटवून दिल्या आहेत.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित आहेत.
दरम्यान, तिथे असलेला जमाव अत्यंत आक्रमक झाला असून तो विषय अजून चिघळू नये यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
अपघातानंतर संतप्त जमावाने दोन क्रेन पेटवून दिल्या आहेत तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन सरकारला धारेवर धरले आहे. पाटकर यांनी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यावर अपघातानंतर पोलिस स्टेशनमध्ये मांडवली केल्याचा आरोप केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.