Goa Accident : राज्यात एक अपघाताची घटना समोर येत आहे. या घटनेत दुचाकीचालकाचा मृत्यु झाला आहे. राज्यात मागील 48 दिवसांत 43 मृत्यु झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात चिंबल येथे घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीस्वार भागंबर सिंग (65, मिलिटरी कॅम्प, फोंडा) हे चिंबल येथे आले असता त्यांच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार भागंबर हे गंभीर जखमी झाले होते.
दरम्यान, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुध्द गुन्हा नोंदवला असून संशयित ट्रक चालकाला जुने गोवे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान आता वाहतूक नियमांचां भंग करून एकापेक्षा अधिकवेळा अपघाताला कारणीभूत ठरल्यास संबंधित वाहनचालकाचा वाहतूक परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचां भंग करणाऱ्यांचा डाटा थेट त्यांच्या लायसन्सशी लिंक करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक बॉसुएट सिल्वा यांनी दिली आहे.
वाहन चालवताना अनेकजण नियमभंग करत असतात. परंतु, त्याची एकत्रित माहिती वाहतूक खात्याकडे नसते. यापुढे मात्र संबंधित नियमभंगाच्या घटना थेट वाहतूक परवान्याशी लिंक केल्या जातील. या सुविधेची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.