रामदेव बाबा आयलें गोंयात, आनी पडले ओवळांच्या मोगात

तीन दिवसीय योग शिबिरास प्रारंभ
Ramdev Baba
Ramdev Baba Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Ramdev Baba Yoga : मिरामार समुद्र किनारी रामदेव बाबा यांच्या तीन दिवसीय योग शिबिराला रविवारी सुरुवात झाली. याच पार्श्वभूवीर शनिवारी रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी तीन दिवस चालणाऱ्या शिबिराची माहिती दिली.

गोव्याला दक्षिण भारतातील पतंजलीचे महत्त्वाचे केंद्र व्हावे, वैचारिक गुलामगिरीतून दर करण्यासाठी केंद्र व्हावे अशी ईच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

Ramdev Baba
Ramdev Baba Yoga : गोव्याला योगभूमी बनवण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करणार : मुख्यमंत्री

यावेळी रामदेव बाबांनी राज्यात ठरावीक काळात मिळणाऱ्या बकुळीच्या फुलांची (Spanish cherry) माळ गळ्यात परिधान केली होती. याच विषयी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्कील भाषेत उत्तर दिले.

रामदेव बाबा म्हणाले, मला या फुलांचा सुगंध मला खूप आवडतो. हा सुगंध घेतल्यावर स्वर्गात पोहचल्याचा आनंद मिळतो असे त्यांनी सांगितले.

Ramdev Baba
Ramdev Baba In Goa : 'पतंजलीचे सर्वात मोठे केंद्र गोव्यात उभारणार' -योगगुरु रामदेव बाबा

पूर्वापारपासून भारतीय आयुर्वेदात बकुळीच्या फुलांचा वापर होत आलाय. ही फुले झाडावरून गळून पडतात आणि देठ झाडावर तसाच राहतो हे या फुलांचं वैशिष्टय़ आहे. यानंतर त्यांचा रंग सफेद असतो मात्र नंतर जशी सुकत जातात तसा चॉकलेटी होतो. या फुलांना बरेच दिवस सुगंध कायम राहतो.

फुलांच्या पाकळ्यांचा भाग गळून पडतो त्यामुळे याला एक छिद्र असतं. या फुलांचे गजरे करण्यासाठी पाकळ्यांचा छिद्रात दोरा ओवतात आणि बकुळाचे गजरे तयार करतात. बुद्धिवर्धक औषधे, अत्तर यासाठी या फुलांचा वापर केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Miramar beach business dispute
Budh Guru Yog 2026
Borim Sai Baba Temple Dispute
150 year idol making tradition
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com