Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: 'कदंब'ची दुचाकीला धडक; धर्मापूर येथील महिलेचा मृत्यू

Goa Accident: महिलेला मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता तिचा मृत्यू झाला.

Pramod Yadav

Goa Bus Accident

धर्मापूर-नावेली येथे कदंब बसची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने प्रतिमा चव्हाण (रा.धर्मापूर) ही दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. नंतर तिचा उपचारादरम्यान दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मृत्यू झाला.

सदर कदंब बस कारवारहून मडगावच्या दिशेने येत होती. तर दुचाकीस्वार प्रतिमा चव्हाण कुंकळ्ळीहून मडगावच्या दिशेने येत होती. कदंब बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण गेल्याने त्याने डिओ दुचाकीला पाठीमागून घडक दिली.

यात ही महिला गंभीर जखमी झाली. तिथे उपस्थित असलेल्यांनी लागलीच तिला मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता तिचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT