karaswada Mapusa Accident Dainik Gomantak
गोवा

Karaswada Accident: महामार्गावर उभ्या कंटेनरला कार धडकली; साताऱ्याहून आलेले 7 पर्यटक जखमी; तिघांवर गोमेकॉत उपचार सुरू

karaswada Mapusa Accident: म्हापसा महामार्गावर पार्क केलेल्या कंटेनरला भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकीने धडक दिल्याने महाराष्ट्रातून आलेले पर्यटक जखमी झाले

Akshata Chhatre

म्हापसा: गोव्यात भरधा वेगाने पाळणाऱ्या गाड्याची संख्या बरीच वाढली आहे, आणि यामधून होणारे अपघात देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. मंगळवारी (दि. २ डिसेंबर) रोजी पहाटे ५:३० च्या सुमारास करासवाडा येथे एक भीषण अपघात घडला. म्हापसा महामार्गावर पार्क केलेल्या कंटेनरला भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकीने धडक दिल्याने महाराष्ट्रातून आलेले ७ पर्यटक जखमी झाले असून यांपैकी तिघांवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

एमएच ०५ सीएम ४९१४ या क्रमांकाच्या अर्टिगा गाडीतून काही पर्यटक साताऱ्याहून गोव्यात पर्यटनासाठी आले होते. वाहन चालकाला महामार्गावर पार्क केलेल्या कंटेनर ट्रकचा अंदाज आला नाही आणि भरधाव वेगात असलेल्या या गाडीने उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिली.

अपघात घडताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी पर्यटकांना बाहेर काढले आणि गंभीर जखमी असलेल्या तिघांना उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले.

सध्या पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत मात्र कंटेनरचा चालक अपघातानंतर पसार झाल्याने सध्या त्या अज्ञात कंटेनर चालकाचा देखील शोध सुरु आहे. अपघातानंतर पोलीस हवालदार नंदू कुडासकर यांनी सहकाऱ्यांसह संपूर्ण घटनेचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT