Karaswada Junction: रस्त्यांची अक्षरशः चाळण, मोठमोठाले खड्डे; करासवाडा जंक्शनची दुरावस्था

Karaswada Junction Bad Road Condition: खड्डे बुजविण्याचे काम गेल्या महिन्यात केले होते पण दोन दिवसांतच ती दगडमाती वाहून गेली
Karaswada Junction Bad Road Condition: खड्डे बुजविण्याचे काम गेल्या महिन्यात केले होते पण दोन दिवसांतच ती दगडमाती वाहून गेली
Karaswada Junction Bad Road ConditionDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश: म्हापसा मतदारसंघातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. कुचेली ते करासवाडा या रस्त्याकडे तर ‘साबांखा’च्या रस्ता विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. निदान येत्या गणेश चतुर्थीपूर्वी तरी या रस्त्यांची तात्पुरती तरी डागडुजी होणार का, असा सवाल वाहनचालक, प्रवासी व नागरिकांकडून केला जात आहे.

करासवाडा येथे उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर मोठमोठाले खड्डे पडून सदरचा रस्ता वाहतुकीसाठी धोक्याचा बनला आहे. यासंबंधीचे वृत प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या म्हापसा विभागाकडून खड्डे बुजविण्याचे काम गेल्या महिन्यात केले होते. पण दोन दिवसांतच ती दगडमाती वाहून गेली.

या सर्व्हिस रोड वरून रात्रंदिवस हजारो दुचाकी, चार चाकी, व अवजड वाहने ये जा करीत असतात. पणजी, मडगाव,वास्को व इतर ठिकाणी जाणारी वाहने उड्डाण पुलावरून जातात. परंतु अंतर्गत भागात जाणारी वाहने या सर्व्हिस रोड वरून जातात. या मार्गावरून म्हापसा ते कोलवाळ,पेडणे या मार्गे तसेच करासवाडा, कुचेली, धुळेर या मार्गेही जात आहेत. मोपा विमानतळावरून येणारी व जाणारी टुरिस्ट वाहने याच मार्गे जातात.

दरम्यान, म्हापसा पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १ मध्ये येत असलेला कुचेली ते करासवाडा मुख्य रस्त्यावर गुडघ्याएवढे खड्डे, कंबरभर पाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ता विभाग करते काय, असा संतापजनक प्रश्न या प्रभागाचे नगरसेवक आनंद भाईडकर यांनी केला आहे.

येथील मार्गावर असलेल्या एका घरातील रहिवाशी संतोष रायकर यांनी सांगितले की,या मार्गावरून जी वाहने जातात ती पाहून आम्हाला धक्का बसतो.कारण हा मार्ग म्हणजे महामार्ग झालेला आहे. आपल्या समोरच अनेक दुचाकीस्वार सहप्रवाशांसह पडून जखमी झाले आहेत.

Karaswada Junction Bad Road Condition: खड्डे बुजविण्याचे काम गेल्या महिन्यात केले होते पण दोन दिवसांतच ती दगडमाती वाहून गेली
Karaswada Flyover Leakage: करासवाडा येथे महामार्गाच्या उड्डाणपुलाला गळती

एकाचा बळी

दोन दिवसांपूर्वीच पहाटे ७८ वर्षीय विनायक धारगळकर (आकय करासवाडा) यांना ते फिरायला जाताना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला व तो जागी ठार झाल्याची घटना घडली. या मार्गावर वारंवार अपघात होतात. अनेकजण जखमी होतात. वाहनांची मोडतोड ही झालेली असते.

सध्या पाऊस पडत आहे. त्यामुळे डांबरीकरण करणे शक्य नाही. पुढच्या आठवड्यापासून आम्ही या ठिकाणी पेव्हर्स टाकून तात्पुरती डागडुजी करणार आहे. हे पाणी साठण्यामागचे कारण या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटाराची व्यवस्था नाही. तीही करणे गरजेचे आहे. पावसाळ्यानंतर डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

महेश शेट्टी, अभियंते सार्वजनिक बांधकाम विभाग

कुचेली ते करासवाडा हा रस्ता सुमारे एक ते दीड किलोमीटर आहे. या मार्गावरून दिवसा व रात्री हजारो लहान मोठी वाहने ये जा करतात. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. हा मार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागाकडून म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी दुरुस्त करून घेणे आवश्यक असूनही तो केला जात नाही.

आनंद भाईडकर, नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com