Accident on Atal Setu Dainik Gomantak
गोवा

अटल सेतूवर सलग दुसऱ्या दिवशी कारचा अपघात

रविवारी विचित्र अपघातानंतर अटल सेतूवर वाहनांच्या मोठ्या रांगा; वाहतुकीची कोंडी

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात अटल सेतूवर अपघातांची मालिका सुरुच आहे.‌ काल रविवारी रात्री झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातानंतर आज पुन्हा एकदा या सेतूवर अपघात झाला आहे. एका भरधाव कारची वीजेच्या खांबाला धडक‌ बसल्याने भीषण अपघात झाला. अपघातात कारच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं.

अटल सेतूवर एक खड्डा पडल्याची माहिती असून हा खड्डा चुकवण्याच्या नादात वाहनांचे अपघात होऊ लागले आहेत. त्यातच अटल सेतूवर केवळ चारहून अधिक चाकं असणाऱ्या वाहनांनाच प्रवेश असल्यामुळे बहुतांश वाहनं ही वेगात असतात. त्यामुळे अनेकदा चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत असल्याचं दिसून आलं आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकाच जागी 4 गाड्यांचा अपघात झाल्यामुळे पुलावरील वाहतुकीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

पणजी आणि पर्वरीला जोडणाऱ्या अटल सेतूवर रविवारी संध्याकाळी विचित्र अपघात झाला. यात दोन गोव्यातील वाहनं तर एक महाराष्ट्रातील वाहन अपघातग्रस्त झालं. रस्त्याच्या मधोमध खड्डा आल्याने कारचालकाने ब्रेक लावला. यामुळे कारच्या मागून येणाऱ्या दोन कारचालकांची समोरील कारला जोरदार धडक बसली. अपघातानंतर वाहतुकीची मोठी कोंडी पाहायला मिळाली. पोलिसांनी क्रेन आणून अपघातग्रस्त वाहनं बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT