नागवा हडफडेत अग्नितांडव; स्क्रॅपयार्ड जळून खाक

मध्यरात्री लागलेल्या आगीत दोन मालवाहू टेम्पोसह स्क्रॅपचे सामान भस्मसात
Fire in Arpora
Fire in ArporaDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट : नागवा-हडफडे येथील लेझी-बी हॉटेल परिसरात असलेल्या स्क्रॅपयार्डला शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत दोन मालवाहू टेम्पो तसेच अन्य स्क्रॅपचे सामान जळून खाक झाले. भुपाळ नाईक यांच्या मालकीच्या असलेल्या या स्क्रॅपयार्डमध्ये शॉर्टसर्किट मुळे ही आग लागल्याचा अंदाज पिळर्ण अग्निशमन दलाने व्यक्त केला.

Fire in Arpora
गोव्यात रेल्वे दुपदरीकरणाला NBWL ने दिलेली मान्यता सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द

आगीमुळे दलाच्या कर्मचाऱ्यांनी अंदाजे पाच लाखाहून अधिक किंमतीचा माल आगीत जळण्यापासून वाचवला. दरम्यान, नागोवा हडफडे पंचायत क्षेत्रात असलेल्या सर्वच्या सर्व स्क्रॅप यार्डाची तसेच तेथील सुरक्षेची लवकरच पाहणी व सर्व्हे करण्यात येणार असल्याचे नागोवा हडफडेचे सरपंच श्रीकृष्ण हळदणकर यांनी सांगितले.

Fire in Arpora
म्हापशात घरांना भीषण आग, लाखोंचं सामान जळून खाक

दरम्यान मागच्याच महिन्यात म्हापसा येथील दत्तवाडी परिसरात एका घराला आग लागल्याने खळबळ उडाली होती. या भीषण अग्नितांडवात चार कुटुंबीयाचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले होते. अग्निशामक दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली होती. आग लागल्याची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रयत्नांची शर्थ करत आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com