तीस वर्षांनंतर फोंड्यात नवीन कदंब बसस्थानक!

सध्याचे धोकादायक बसस्थानक प्रवाशांसाठी बंद, तात्पुरती निवारा शेड उभारुन बससेवा राहणार सुरु
Kadamba Bus Stand
Kadamba Bus StandDainik Gomantak

फोंडा : तब्बल तीन दशकांनंतर फोंड्यातील कदंब बसस्थानक कात टाकणार आहे. तीस वर्षांच्या कालखंडानंतर आता फोंड्यात नवीन बसस्थानक उभारण्यात येणार असून सध्या धोकादायक बनलेल्या कदंब महामंडळाच्या बसस्थानक वास्तूत प्रवाशांना बसण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हे बसस्थानक धोकादायक स्थितीत असल्यामुळे प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याची कदंब महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Kadamba Bus Stand
रेल्वे दुपदरीकरणाला स्थगिती हा गोव्याच्या अस्मिता रक्षणकर्त्यांचा विजय - दिगंबर कामत

राज्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आणि दक्षिण-उत्तर गोवा जोडणाऱ्या फोंडा कदंब बसस्थानकावरून केवळ राज्यातीलच नव्हे तर आंतरराज्य प्रवासी वाहतूक सेवा सुरू असते. कदंब महामंडळाबरोबरच कर्नाटक तसेच इतर राज्यातील महामंडळाच्या तसेच खाजगी बसगाड्या या बसस्थानकावर येतात. त्यामुळे फोंडा तालुक्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.
हे बसस्थानक तसे फोंड्याचे असले तरी मडकई मतदारसंघाच्या अखत्यारित येते. आता ज्या ठिकाणी बसस्थानक उभारण्यात आले आहे, त्या ठिकाणी मैदान होते. या मैदानावर क्रिकेट व फुटबॉल स्पर्धांचे सामने व्हायचे. पण वाढती वाहतूक व्यवस्था आणि लोकसंख्येमुळे फोंड्यातील जुन्या बसस्थानकावर ताण यायला लागल्यामुळे या मैदानाचे रुपांतर अखेर बसस्थानकात करण्यात आले होते.

Kadamba Bus Stand
जंगलात सापडला महिलेचा मृतदेह; कुडचडे पोलिसांकडून तपास सुरू

फोंड्याचे विद्यमान आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक हे मुख्यमंत्री असताना केवळ वर्षभरातच हे बसस्थानक उभारण्यात आले. 1991 मध्ये या बसस्थानकाची पायाभरणी करण्यात आली आणि 1992 मध्ये ते लोकार्पण करण्यात आले. मात्र लोकार्पण करूनही बराच काळ या बसस्थानकाचा वापर झाला नाही. तब्बल तीनवेळा हे बसस्थानक सुरू करण्यात आले. दोनवेळा बसस्थानक सुरू केले तरी वाहतूक व्यवस्था बंद पडली, मात्र तिसऱ्यांदा हे बसस्थानक खुले करण्यात आल्यानंतर आजतागायत त्याचा वापर सुरू आहे.

सध्या धोकादायक स्थितीत असलेल्या फोंड्यातील या कदंब बसस्थानकाचे नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. हे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे आणि दोन वर्षांच्या आत नवे कोरे कदंब बसस्थानक प्रवाशांच्या दिमतीला असेल असे कदंब महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com