Velankanni To Goa Car Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: भरधाव कारचा टायर फुटला अन् वालंकिणीहून परतणारे सहा भाविक जखमी

जखमींना अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले

Rajat Sawant

Velankanni To Goa Car Accident : तामिळनाडू वालंकिणी येथील सायबिणीचे दर्शन घेऊन गोव्यात येताना तिने घाट नजीक बलेनो कारचा टायर फुटल्याने अपघातात पंचवाडी शिरोडा येथील सहा भाविक जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सकाळी घडला. अपघातातील जखमींना रामनगर सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, बलेनो कारमधूून डिसोजा कुटुंबातील सहा जण तामिळनाडू येथील वालंकिणी येथे सायबिणीच्या दर्शनाला गेले होते. तेथून गोव्याच्या दिशेने येताना रविवारी सकाळी तिने घाट नजीक कारचा टायर फुटल्याने कारने दोन ते तीन वेळा पलटी घेतली व कार रस्त्याच्या कडेला खाली कोसळली.

अपघातात राजानोरी डिसोजा (62), पियाजा डिसोजा (38) हे जखमी झाले तर पीटर डिसोजा, विलोना डिसोजा, नाय लॉस डिसोजा (02), नाईस डिसोजा (08) हे किरकोळ जखमी झाले आहे. या अपघाताची नोंद रामनगर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. अपघातातील जखमींना रामनगर सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT