Car Accident in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : कार नाल्यात कोसळून भीषण अपघात; चौघांना वाचवलं

अपघातांवरुन गोव्यात रस्ते सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात गेल्या काही तासांमध्ये अपघातांची मालिका सुरु आहे. झुआरी पुल दुर्घटनेला काही तास उलटतात न उलटतात तोच आता आणखी एक कार नाल्यात कोसळून अपघात झाला आहे. या कारमध्ये चार प्रवासी होते, ज्यांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र या अपघातांवरुन गोव्यात रस्ते सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.

शुक्रवारी पहाटे 4.13 मिनिटांनी अग्निशमन दलाला एक कार नाल्यात कोसळल्याची माहिती मिळाली. तातडीने वास्को अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि कारमध्ये अडकलेल्या चौघांची सुखरुप सुटका केली. चिखलीतील रिमा बारजवळच असलेल्या सांडपाण्याच्या पुलावरुन ही कार नाल्यात कोसळली.

कारमधील चौघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप डिचोलकर यांनी दिली आहे.

दरम्यान झुआरी पुलावरुन बुधवारी मध्यरात्री कार नदीत कोसळल्याने भीषण अपघात झाला होता. तब्बल 12 तासांनंतर अपघातग्रस्त काळ्या रंगाची डस्टर कार बाहेर काढण्यात शोधपथकाला यश आलं. या दुर्घटनेत चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दुसरीकडे काल गुरुवारी संध्याकाळी मडगावात अल्टो कारची दुचाकीला जोरदार धडक बसून अपघात झाला. यात दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Public University Bill: 'गोवा सार्वजनिक विद्यापीठ' विधेयकावर सूचनांचा पाऊस! 'क्लस्टर युनिव्हर्सिटी'वर चर्चा; सुभाष शिरोडकरांनी पुन्हा बोलावली बैठक

Highway Expansion Issues: 'देवाला मानणारे कामत आम्हाला न्याय देतील': घर वाचवण्यासाठी भोमवासीयांची मंत्रालयात धाव

Goa Politics: "तेच खरे नरकासुर!" विरोधकांच्या एकजुटीवर वीजमंत्री ढवळीकरांचा हल्लाबोल, नरकासुर दहन प्रथा बंद करण्याचीही केली मागणी

Goa Politics: भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी 'एकजुटी'चा फॉर्म्युला, गोव्याच्या राजकारणात नवी खेळी! विरोधकांच्या युतीवर विजय सरदेसाईंचा भर

Goa Financial Reforms: राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा बोजा! आणीबाणीचा निधी आता कर्ज फेडणार; सावंत सरकारने 'हमी मोचन निधी'च्या नियमांत केली सुधारणा

SCROLL FOR NEXT