Accident Cases in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case : रस्‍ते अपघातांत वर्षाला सरासरी १०० तरुणांचा बळी

Goa Accident Case : दर तिसाव्‍या तासाला होणारा अपघाती मृत्‍यू यावर्षी पोहोचला २५व्‍या तासांवर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident Case :

मडगाव, मागच्‍या वर्षी गोव्‍यात पूर्ण वर्षात २९० जणांचा रस्‍ता अपघातात बळी गेला होता. या वर्षी पहिल्‍या १०७ दिवसांतच १०२ जणांचा बळी गेला आहे. मागच्‍या वर्षातील बळींची संख्‍या पाहिल्‍यास गोव्‍यात दर तिसाव्‍या तासाला एक बळी जात होता. मात्र यंदा हे प्रमाण दर २५व्‍या तासाला एक बळी असे झाले आहे.

मागच्‍या वर्षांतील बळींची आकडेवारी पाहिल्‍यास गोव्‍यात एका वर्षाला सरासरी १०० तरुणांचे बळी रस्‍ता अपघातात जात असल्‍याचे भीषण सत्‍य पुढे आले आहे.

मागच्‍या वर्षीच्‍या अपघातांची आकडेवारी पोलिस खात्‍याने काल जारी केली होती. ती आकडेवारी पाहिल्‍यास मागच्‍या वर्षी एका आठवड्याला पाच लोकांचे बळी गेल्‍याचे दिसून आले असून यातील ७० टक्‍के मृत्‍यू दुचाकीस्‍वारांचे असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. यातील आणखी एक भीषण अशी बाब म्‍हणजे, एक तृतीयांश म्‍हणजे ३० टक्‍के रस्‍ता अपघातातील बळी हे १८ ते ३५ या वयोगटातील असून यातील बहुतेक बळी हे दुचाकी अपघातातील आहेत.

२०२३ सालची जी आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे त्‍यात या संपूर्ण वर्षात एकूण २८४६ अपघात झाले होते. त्‍यापैकी २०७२ अपघात ग्रामीण भागात तर ७७४ अपघात शहरी भागात झाले आहेत. यापैकी २६२५ अपघात दोन वाहनांमध्‍ये झालेल्‍या टक्‍करीत झाले आहेत तर १५९ अपघात हे वाहनांची धडक पादचाऱ्यांना बसून झालेले आहेत.

मागच्‍या वर्षी ज्‍या २९० लोकांना अपघाती मृत्‍यू आला, त्‍यापैकी २५१ मृत्‍यू पुरुषांचे तर ३९ मृत्‍यू महिलांचे आहेत. रस्‍ते अपघातात एकूण ११७८ लोक जखमी झाले. त्‍यापैकी ९७० पुरुष तर २०८ महिला आहेत.

जे अपघात घडले त्‍यापैकी १०४७ अपघात हे अतिवेगाने वाहने हाकल्‍यामुळे झाले असून अशा अपघातात ९७ जणांना मरण आले. मागच्‍या वर्षी जे २९० जण रस्‍ता अपघातात ठार झाले त्‍यापैकी १७१ हे दुचाकीस्‍वार, ४४ पादचारी, २१ चारचाकी वाहनांतील चालक व प्रवासी, चार सायकलस्‍वार यांचा समावेश होता.

गोव्‍यात वाढलेले रस्‍ता अपघात आणि त्‍यात होणारे मृत्‍यू ही गंभीर बाब आहे. या अपघातांमुळे कित्‍येक संसार उद्‍ध्‍वस्‍त होतात. त्‍यामुळे अशा अपघातांवर नियंत्रण येणे गरजेचे आहे. मात्र त्‍यासाठी फक्‍त पोलिस यंत्रणेवरच अवलंबून न राहाता लोकांनी वैयक्‍तीक स्‍तरावरही त्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. सर्वांनी एकत्र प्रयत्‍न केले तर हे प्रमाण निश्‍चितच कमी होऊ शकेल.

- जसपाल सिंग, पोलिस महासंचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Jersey Number 7: थालाचा नवा अवतार! 7 नंबरची जर्सी बदलून धोनी रचणार नवा इतिहास? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Zodiac Personality Traits: गप्प बसतात पण सगळा हिशोब ठेवतात! 'या' 6 राशींचे लोक चालते-फिरते डिटेक्टिव्ह; चुटकीसरशी ओळखतात शत्रूचा डाव

Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

VIDEO: 'लाईफ इज ब्युटीफुल इन गोवा!' हरमनप्रीत कौर अन् पेलेचा व्हिडिओ व्हायरल; किनाऱ्यावर रंगली गप्पांची मैफल

Pilgao: सफर गोव्याची! म्हादई समुद्राला मिळण्यापूर्वी लागणारे, छोटेसे टुमदार 'पिळगाव'

SCROLL FOR NEXT