Goa Loksabha: गोव्याचा आवाज दिल्लीत पोहचवणार; शक्तीप्रदर्शन करत खलप, फर्नांडिस यांचे अर्ज दाखल

Goa Congress Loksabha Candidate: दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर गोव्याचा आवाज आणि लढाई दिल्लीत नेणार, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Goa Congress Loksabha Candidate
Goa Congress Loksabha Candidate

Goa Congress Loksabha Candidate

काँग्रेसचे उत्तर गोव्यातील उमेदवार अ‍ॅड. रमाकांत खलप आणि दक्षिण गोव्यातील उमेदवार विरियातो फर्नाडिस यांनी शक्ती प्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज सादर केले.

दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर गोव्याचा आवाज आणि लढाई दिल्लीत नेणार, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पणजी व मडगावमध्ये अर्ज सादर करण्यापूर्वी फेरी काढून कॉंग्रेसने घटक पक्षांच्या नेत्या कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन केले. काल भाजपच्या शक्तीप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसनेही शक्तीप्रदर्शन केल्याने तुलना होणे साहजिकच आहे.

अपक्षांनाही अर्ज सादर करणे सुरू झाले असून ते एकेकट्याने येऊन अर्ज सादर करू लागले आहेत. रमाकांत खलप यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहा गिते यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

Goa Congress Loksabha Candidate
Goa Accident Death: गोव्यात 108 दिवसात 101 अपघात बळी; बाळ्ळीत बसच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लस फेरेरा, आपचे राज्य संयोजक अ‍ॅड. अमित पालेकर, शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत, गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर आदी होते.

दरम्यान, कॅप्टन विरियातो यांनी उमेदवारी अर्ज दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व निर्वाचन अधिकारी आश्विन चंद्रू यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, आमदार विजय सरदेसाई, आमदार व्हेंझी व्हिएगस, आमदार क्क्रुझ सिल्वा, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुझे फिलिप हे नेते उपस्थित होते.

Goa Congress Loksabha Candidate
CM चं मत तेच माझं मत; म्हादई, डबल ट्रॅकिंग, कोळसा, मेगा प्रोजक्टवर पल्लवी धेंपे यांनी बोलणं टाळलं

40-50 हजारांच्या मताधिक्याने जिंकेन

मी विजयी झाल्यागत मला कार्यकर्त्यांनी विजयी हार घातला आहे. प्रचारासाठी जेथे जेथे गेलो, तिथे लोकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देणे सुरू केले आहे. भाई तू पुढे जा असे सगळेजण सांगत आहेत. गेली 25 वर्षे उत्तर गोव्याचा आवाज लोकसभेत पोचला नव्हता. त्यामुळे लोक म्हणतात की, आमचा आवाज बनून तुम्ही लोकसभेत जा. 40-50 हजारांच्या मताधिक्याने मी जिंकेन हे आजच स्पष्ट झाले आहे, असा विश्वास 'इंडिया' आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप यांनी व्यक्त केला.

गोव्याचे प्रश्न संसदेत मांडणार

गोव्यात सध्या अनेक मुद्द्यावरून लढाई सुरु आहे. त्यात रेल्वे दुपदरीकरण, कोळसा वाहतूक, तमनार प्रकल्प, बंद असलेला खाण उद्योग, म्हादई नदी, वनांचे होत नसलेले संरक्षण अशा अनेक विषयांचा त्यात समावेश आहे. हे सर्व प्रश्न आपण खासदार म्हणून निवडून आल्यावर संसदेत मांडणार व गोव्याची लढाई दिल्लीत नेणार आहे, असे विरियातो फर्नांडिस म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com