Goa Congress MLA Dainik Gomantak
गोवा

गोव्यात राजकीय घडामोडीला वेग; कॉंग्रेसचे काही आमदार नॉट रिचेबल

दिगंबर कामत हे या बैठकीला गैरहजर होते.

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात सध्या जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. दिनेश गुंडु राव यांनी मडगाव हॉटेलमध्ये बैठक बोलावल्यानंतर, अनेक काँग्रेस आमदार बैठकीला उपस्थित होते आणि सर्वांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला. दिगंबर कामत हे या बैठकीला गैरहजर होते. त्यामुळे GPCC अध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह काही आमदारांनी दिगंबर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

(Accelerate political developments in Goa; Some Congress MLAs are not reachable)

या बैठकीनंतर पणजीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित राहणार होते. विशेष म्हणजे काँग्रेसचे आमदार मडगाव सोडून पणजीला येईपर्यंत अनेक आमदार नॉट रिचेबल होते. संकल्प आणि रुडॉल्फ हे दोनच आमदार परिषदेच्या ठिकाणी पोहोचले तर राजेश फळदेसाई आणि केदार नाईक हे अलतिन्हो येथील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बंगल्यावर पोहोचणारे पहिले दोन आमदार होते. राजकीय परिस्थितीमुळे काँग्रेस आपली नियोजित पत्रकार परिषद घेऊ शकली नाही', असे दिनेश गुंडू राव यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काँग्रेसच्या बैठकीच्या ठिकाणी पोहोचलेले मायकेल लोबो काही मिनिटांनीच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात जाण्यासाठी तेथून निघून गेले. दिगंबर कामत यांच्यासह अन्य आमदारांचा ठावठिकाणा अद्यापही नाही. गिरीश चोडणकर यांनी दिगंबर यांच्याशी झालेल्या भेटीला नकार दिला आहे.

काँग्रेस पक्षाची स्थिती डळमळीत

पावसाळी अधिवेशन एक दिवसावर आलेले असताना काँग्रेस पक्षाची स्थिती डळमळीत झालेली असून काँग्रेस पक्ष फुटून आठ आमदार भाजपात सामील होणार असे सांगण्यात येत आहे. काँगेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी मडगावत हॉटेल ला ग्रेस येथे काँग्रेस आमदारांची बैठक बोलाविली होती.

पण ज्येष्ठ काँग्रेस आमदार दिगंबर कामत यांनी परत एकदा या बैठकीस उपस्थित न राहणे पसंत करीत मी इंज्युअर्ड प्लेयर असे सांगत आपण काँग्रेस बराबर नाही असे जाहीर केल्याने अनिश्चितता निर्माण झाली असून दुसऱ्या बाजूने सभापती रमेश तवडकर यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर व्हा असे सांगितल्याने काँग्रेसमध्ये फूट पडणार हे निश्चित असे सांगितले जाते.

आज सकाळपासून मडगाव येथील ला ग्रेस मॅजेस्टिक हे हॉटेल घडामोडींचा केंद्रबिंदु ठरले ठरले होते. मायकल लोबो यांच्यासह 9 आमदार या हॉटेलमध्ये उपस्थित राहिल्याने काँग्रेसमध्ये सर्व आलबेल असे सांगितले जात होते मात्र नंतर केदार नाईक व राजेश फळदेसाई यांनी हे हॉटेल सोडून दिगंबर कामत यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

Margao Dindi Utsav: 'पंढरपूरला पोर्तुगीज जायला देत नाही तर प्रत्‍यक्ष पंढरपूरच मडगावी आणायचं’, आनंद पर्वणी दिंडी महाेत्‍सव

SCROLL FOR NEXT