गोवा: राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कॉंग्रेस पक्षातील आमदार सध्या चर्चेत आहेत. कॉंग्रेसचे आमदार भाजप मध्ये सामिल होणार का? या प्रश्नाला काही वेळातच पूर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे. कारण अवघ्या काही मिनीटातच कॉंग्रेसचे सर्व आमदार आज संध्याकाळी 6.45 वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान कॉंग्रेसच्या राजकीय घडामोडीचं चित्र काही वेळातच स्पष्ट होईल.
(All Congress MLAs will hold a joint press conference in Panaji)
कॉंग्रेसच्या या राजकीय चर्चेला फाटा देत, "मी कुठे जाणार नाही याची हमी देतो. इतरांचे मी काही सांगू शकत नाही" असे विधान करत कार्लुस फेरेरा यांनी पूर्ण विराम दिला. दरम्यान, पक्षांतरासाठी माझ्याशी कोणीच संपर्क साधलेला नसल्याचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षाची स्थिती डळमळीत
पावसाळी अधिवेशन एक दिवसावर आलेले असताना काँग्रेस पक्षाची स्थिती डळमळीत झालेली असून काँग्रेस पक्ष फुटून आठ आमदार भाजपात सामील होणार असे सांगण्यात येत आहे. काँगेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी मडगावत हॉटेल ला ग्रेस येथे काँग्रेस आमदारांची बैठक बोलाविली होती.
पण ज्येष्ठ काँग्रेस आमदार दिगंबर कामत यांनी परत एकदा या बैठकीस उपस्थित न राहणे पसंत करीत मी इंज्युअर्ड प्लेयर असे सांगत आपण काँग्रेस बराबर नाही असे जाहीर केल्याने अनिश्चितता निर्माण झाली असून दुसऱ्या बाजूने सभापती रमेश तवडकर यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर व्हा असे सांगितल्याने काँग्रेसमध्ये फूट पडणार हे निश्चित असे सांगितले जाते.
आज सकाळपासून मडगाव येथील ला ग्रेस मॅजेस्टिक हे हॉटेल घडामोडींचा केंद्रबिंदु ठरले ठरले होते. मायकल लोबो यांच्यासह 9 आमदार या हॉटेलमध्ये उपस्थित राहिल्याने काँग्रेसमध्ये सर्व आलबेल असे सांगितले जात होते मात्र नंतर केदार नाईक व राजेश फळदेसाई यांनी हे हॉटेल सोडून दिगंबर कामत यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.