गोव्यात ऑगस्ट महिन्यात अत्यंत कमी पावसाची नोंद झाली. पण, सप्टेंबर महिन्यात गोव्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. संपूर्ण देशातच सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढेल, असे IMD गोव्याचे शास्त्रज्ञ राहुल एम यांनी सांगितले आहे. IMD ने म्हटले आहे की ईशान्य भारतातील अनेक भाग आणि पूर्व आणि वायव्य भारतातील काही भाग वगळता भारताच्या बहुतेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या, विषुववृत्तीय पॅसिफिक प्रदेशावर 'ला निना'चा प्रभाव दिसत आहे.
मान्सून मिशन हवामान अंदाज प्रणालीनुसार (Monsoon Mission Climate Forecasting System) ला निनाचा प्रभाव वर्षअखेरीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. इतर हवामान मॉडेल देखील आगामी हंगामात 'ला नीना' कायम राहण्याचे देत आहे, असे IMD ने म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.