वालांका आलेमाव AIFF च्या कार्यकारिणीत, 85 वर्षात निवडून आलेल्या पहिल्या महिला

Valanka Alemao
Valanka AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

चर्चिलकन्या वालांका आलेमाव (Valanka Alemao) अखिल भारतीय फुटबॉल महासंघांच्या (All India Football Federation) कार्यकारी समितीत निवड झाली आहे. भारतीय फुटबॉल महासंघांच्या 85 वर्षाच्या इतिहासात निवडून आलेल्या वालांका पहिल्या महिला ठरल्या आहेत. एका महिलेसाठी AIFF च्या कार्यकारिणीत प्रवेश मिळवणे पुरूषांपेक्षा अधिक कठिण असल्याचे वालांका आलेमाव यांनी म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर भारतीय फुटबॉल महासंघांची निवडणूक शुक्रवारी (दि.02) नवी दिल्लीत पार पडली. यावेळी महासंघाच्या अध्यक्षपदी कल्याण चौबे यांची निवड झाली आहे. या निवडणूकीत 34 राज्य संघनांनी मतदान केले, त्यापैकी 33 मते कल्याण चौबे यांना मिळाली तर, माजी भारतीय फुटबॉलपट्टू भाईचुंग भुतिया यांना केवळ एक मत मिळाले.

Valanka Alemao
राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट राष्ट्रीय सरासरीच्या 7 पट

याशिवाय, महासंघाच्या उपाध्यक्षपदी एन. ए हॅरिस तर, कोषाध्यक्षपदी किपा अजय यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारी समितीवर एकूण चौदा जणांची निवड करण्यात आली आहे. तसेच, माजी भारतीय फुटबॉलपट्टू भाईचुंग भुतिया, आयएम विजयन यांच्यासह इतर तिघांची सह-नियुक्त प्रख्यात माजी खेळाडू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

एक गोमंतकीय म्हणून मला महासंघात निवड झाल्याचा मला अभिमान आहे. गोवा हा भारतीय फुटबॉलचा 'मक्का' म्हणून प्रसिद्ध आहे. गोव्याचे प्रमाणिकपणे प्रतिनिधित्व करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपल्या सर्वांना एकजूट होऊन काम करणे गरजेचे असल्याचे वालांका म्हणाल्या.

Valanka Alemao
Amit Patkar : मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com