Pramod Sawant 

Tourism 

 

Dainik Gomantak 

गोवा

गोव्यातील 4 पर्यटन प्रकल्पांमध्‍ये सुमारे 230 कोटींची गुंतवणूक

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठकीत दहापैकी चार प्रकल्‍पांच्‍या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. .

दैनिक गोमन्तक

पणजी: गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक होऊन दहापैकी चार प्रकल्‍पांच्‍या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये लाटंबार्से व कुंडई येथील प्रकल्पांचा समावेश आहे. एक प्रकल्प खासगी आहे. या प्रकल्पांमध्‍ये सुमारे 230 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे व त्याद्वारे 1489 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 82 टक्के रोजगार हा स्थानिकांना मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

दरम्‍यान, राज्यातील पर्यटन धोरण आणि पर्यटनाभिमुख प्रकल्पांच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोवा पर्यटन महामंडळाची पहिली बैठकही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरी सचिवालयात झाली. पर्यटन (Tourism) क्षेत्राची शाश्‍वत आणि जलद वाढ सुनिश्‍चित करण्यावर त्‍यात चर्चा झाली. यापुढे पर्यटनाबाबतचे निर्णय या मंडळामार्फत घेतले जाणार आहेत.

उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर (Manohar Ajgaonkar) यांनी सांगितले की, गोवा (Goa) पर्यटन मंडळ पर्यटन धोरणाची अंमलबजावणी आणि राज्यांत अनेक नवीन पर्यटन सेवा सुरू करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. गोवा पर्यटनच्या गोवाच्या प्रभावी कामकाजासाठी सीईओच्या नियुक्तीवरही या बैठकीत चर्चा झाली.

मंडळामध्ये राज्य आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि पर्यटन व्यवसायाशी संलग्न संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. या बैठकीला मुख्य सचिव परिमल राय, मुख्यमंत्र्यांचे सचिव अशोक कुमार, पर्यटन संचालक मेनिनो डिसूझा व निखिल देसाई आणि इतर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT