Abhang singing competition Dainik Gomantak
गोवा

हडफडेत 29 मार्च रोजी अभंग गायन स्पर्धा

पाच भजन कलाकारांचा सत्कार

दैनिक गोमन्तक

म्हापसा: भाटी-हडफडे येथील श्री आरवेश्वर देवस्थानात कै. वासुदेव रेडकर यांच्या स्मरणार्थ ‘के.डी.आर. बॉइस ऑफ आरपोरा’ने मंगळवार 29 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजल्यापासून अखिल गोवा अभंग गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

त्यानंतर रात्री आठ वाजता कळंगूटचे आमदार मायकल लोबो व शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांच्या हस्ते हडफडे गावचे ज्येष्ठ भजन कलाकार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यामध्ये दयानंद बी. दिवकर, कै. शाबी विष्णू मांद्रेकर, तुकाराम मधुकर दिवकर, संजीव नारायण हरमलकर व सदानंद शांताराम पेडणेकर या पाच कलाकारांचा समावेश आहे.

या स्पर्धेसाठी 15 वर्षांखालील, खुला महिला गट व खुला पुरुष गट असे तीन गट असतील. 15 वर्षाखालील मुले ही 29 मार्च 2007 च्या नंतर जन्मलेली असावी. जन्मदाखला आयोजकांना सादर करणे अनिवार्य असेल. लहान गटात 10, महिला गटात 15 व पुरुष गटात 15 अशा एकूण 40 स्पर्धकांना रात्री 8 वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी प्रवेशशुल्क 100 रुपये स्विकारुन प्रवेश दिला जाईल. अभंगाचा अवधी पाच ते सात मिनिटांचा असावा. प्रत्येक स्पर्धकाने टाळ वाजवून अभंग सादर करावा अन्यथा गुण कमी केले जातील. अभंग गायन स्पर्धा, सूत्रसंचालन हेडलॅन्ड, सडा- वास्को येथील संतोष गजानन मोरुडकर हे करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Indians: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! महेला जयवर्धनेनं सोडलं मुख्य प्रशिक्षकपद; IPL 2027 आधी मोठा बदल

Organic Agriculture: गोव्यात 10 टक्के क्षेत्रातही सेंद्रिय शेती नाही! रासायनिक शेतीचे दुष्परिणाम सांगत उदय प्रभुदेसाई यांचे आवाहन

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

VIDEO: मृतदेहांचं पोस्टमार्टम होणाऱ्या खोलीत दारूची पार्टी! डॉक्टराचा व्हिडिओ व्हायरल, प्रशासनाने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT