पणजी : विधानसभा निवडणुकीत दोन आमदार निवडून आणण्यात यशस्वी झालेल्या आम आदमी पक्षाने आता राज्यात आपली नवी इनिंग सुरू केली आहे. पक्षातर्फे आगामी पंचायत आणि लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आलीय.
गोवा प्रभारी आणि दिल्लीच्या आमदार अतिशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत पक्षाची नवी जम्बो कार्यकारिणी जाहीर करतानाच प्रदेशाध्यक्ष म्हणून ॲड. अमित पालेकर तर आमदार कॅ. व्हेंझी व्हिएगस व क्रुझ सिल्वा यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. निवडणुकांची जबाबदारी माजी मंत्री महादेव नाईक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
आतिशी म्हणाल्या की, गोव्यातील लोकांनी ‘आप’वर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात मतदान केले. बाणावली आणि वेळ्ळी मतदारसंघात आमच्या उमेदवारांचा विजय झाला. पक्ष म्हणून ‘आप’ केवळ निवडणूकच लढवित नाही तर गोमंतकीयांचा आवाज बनत आहे. भविष्यातही पक्ष असाच काम करत राहील. 2027च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ‘आप’ सरकार स्थापन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष : अॅड. अमित पालेकर, कार्यकारी अध्यक्ष : आमदार कॅ. व्हेंझी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा. उपाध्यक्ष : वाल्मिकी नाईक, अॅड. सुरेल तिळवे, प्रा. रामाराव वाघ, सीसिल रॉड्रिगीस, संदेश तेलेकर आणि पॅट्रिशिया फर्नांडिस. संघटन सचिव : राजेश कळंगुटकर, रितेश चोडणकर, गेर्सन गोम्स आणि प्रेमानंद (बाबू) नानोस्कर. सरचिटणीस (आघाडी संघटना) : उपेंद्र गावकर, सरचिटणीस (प्रचार आणि संवाद) : फ्रान्सिस कुएल्लो, महिला शाखा अध्यक्ष : अॅड. प्रतिमा कुतिन्हो, एसटी शाखा अध्यक्ष : अनिल गावकर, युवक संघ अध्यक्ष : अॅड. अनुप कुडतरकर, अल्पसंख्याक शाखा अध्यक्ष : जेम्स फर्नांडिस, उपाध्यक्ष : सर्फराज अंकलगी, सहसचिव (संघटन) : प्रशांत नाईक, लिंकन वाझ, रॉक मास्कारेन्हस, रोशनी गावस, महेश साताळकर, उदय साळकर, अभिजीत देसाई, मारियो कोर्देरो, सहसचिव (समन्वय) : डॉ. विभास नेरी फर्नांडिस, कायदा कक्ष : अॅड. प्रसाद शहापूरकर, अॅड. सुनील लोरण, अॅड. विष्णू नाईक, प्रसिद्धी समिती : मुख्य प्रवक्ते राजदीप नायक, प्रवक्ते : महादेव नाईक, वाल्मिकी नाईक, अॅड. सुरेल तिळवे, अॅड. प्रतिमा कुतिन्हो, एलिना साल्ढाणा, प्रा. रामराव वाघ, सीसिल रॉड्रिगीस, सिद्धेश भगत. माध्यम प्रभारी : सुचिता नार्वेकर, प्रचार समिती : अध्यक्ष महादेव नाईक, उपाध्यक्ष एलिना साल्ढाणा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.