गोव्यातील किनाऱ्यांवरील शॅक गुंडाळण्यास प्रारंभ

गोव्यातील कामगार परतीकडे : हंगाम संपणार
Goa Shacks News
Goa Shacks NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : पर्यटन हंगाम संपण्यास आठवडाभराचा कालावधी उरला असल्‍याने समुद्र किनाऱ्यावरील शॅक गुंडाळण्यास सुरवात झाली आहे. उत्तर गोव्‍यातील कांदोळी, कळंगुट, बागा, मोरजी, हरमल किनाऱ्यांवरील काही शॅक वगळता इतर व्‍यावसायिकांनी आपापले शॅक काढण्यास प्रारंभ केला आहे. (Shacks to be removed from beaches in Goa)

Goa Shacks News
आता बुडणाऱ्यांचा बचाव करणार अग्निशमन दल!

याबाबत कळंगुट येथील शॅकमालक फ्रान्‍सिस डिसोझा यांनी सांगितले की, या परिसरातील मोजके शॅक वगळता इतर सर्व शॅक येत्‍या आठवड्याभरात काढले जातील. देशी पर्यटक येत आहेत. पण अवकाळी पाऊस आणि प्रचंड उकाडा यामुळे देशी पर्यटकांनी किनाऱ्यांकडे पाठ केली आहे. यामुळे रात्रीच्‍यावेळी जो काही व्‍यवसाय होतो तेवढाच. सध्या दिवसभर पर्यटक शॅकमध्ये येताना दिसत नाहीत.

कांदोळी, कळंगुट आणि बागा किनाऱ्यावर फेरफटका मारला असता, कांदोळी आणि कळंगुटमधल नामांकित शॅक तसेच बागा लेन परिसरातील काही शॅक सुरू आहेत. इतर शॅकचालकांनी आपापले शॅक काढणे सुरू केले आहे. कारण ३१ मे रोजी पर्यटन हंगाम संपत आहे. तसेच हवामान खात्‍याने यंदा मॉन्‍सून लवकर सुरू होण्याचा अंदाज वर्तवला असल्‍याने ऐनवेळी समस्या उद्‌भवू नये यासाठी शॅक काढत असल्‍याचे बागा येथील सचिन सातार्डेकर यांनी सांगितले. येथील शॅकवर पश्‍चिम बंगाल, ओरिसा, उत्तर प्रदेश आदी राज्‍यातून कामाला येणारे कामगार आपापल्‍या गावी परतत असल्‍याचेही ते म्‍हणाले.

Goa Shacks News
गोव्यातील ‘त्या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा!

गेली दोन वर्षे सलग आमचा व्‍यवसाय देशी पर्यटकांमुळे सुरू आहे. एरवी विदेशी विशेषतः रशियन पर्यटकांमुळे आम्‍हाला चांगला व्‍यवसाय होत असे. कोरोना महामारीमुळे गेल्‍यावर्षी विदेशी पर्यटक नव्‍हते.

देशी पर्यटकांत सर्व तऱ्हेच्‍या लोकांचा समावेश असतो. सगळेच काही पैसे खर्च करण्याची ऐपत असणारे असत नाहीत. तरीही यावर्षी पर्यटकांकडे फार पर्याय नसल्‍याने काही प्रमाणात पैसे खर्च करणारे देशी पर्यटक आमच्‍याकडे आल्याने समाधानकारक व्‍यवसाय झाला, अशी माहिती कांदोळीतील नंदन फळदेसाई यांनी दिली.

किनाऱ्यांवरील खासगी जागेतील शॅक, हॉटेल्‍स, रेस्‍टॉरंटस्‌, पब, डिस्‍को हे वर्षभर सुरू असतात. याठिकाणी विकेंडमध्ये गर्दी असते. तसेच पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटकही या ठिकाणी येतात. यामुळे ठराविक परिसर वगळता इतर सर्व शॅक आठवडाभरात काढले जातील.

- दयानंद गावकर, हॉटेल चालक - कळंगुट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com