Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: '2027 च्या निवडणुकीपूर्वी आघाडीचे ठरवले जाईल', पाटकर यांचे मत; 'आतिषीं'च्या वक्तव्यावर व्यक्त होणे टाळले

Amit Patkar: ‘आप’चे आघाडी करण्याचे कोणतेही प्रयोजन नसल्याचा पुनरुच्चार गोवा प्रभारी तथा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी यांनी शनिवारी केला होता. त्यावर पाटकर यांनी ‘गोमन्तक''कडे भूमिका मांडली.

Sameer Panditrao

पणजी: राष्ट्रीय स्तरावर आम आदमी पक्ष इंडिया आघाडीपासून बाजूला झाला आहे; परंतु गोव्यातील २०२७ च्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याविषयी आताच आम्ही काही सांगू शकत नाही. निवडणुकीपूर्वी आघाडीविषयी ठरविले जाते.

त्यामुळे ‘आप’च्या गोवा प्रभारी आतिषी यांनी केलेल्या वक्तव्यावर लगेच व्यक्त होणे अजिबात उचित होणार नाही, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केले.

गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्वास गमावला आहे. इतर राज्यांच्या व लोकसभा निवडणुकांबाबत काँग्रेसने घेतलेली भूमिका पाहता केंद्रीय स्तरावर आप इंडिया आघाडीचा घटक राहिलेला नाही.

परंतु इतर विरोधी पक्षांच्याबरोबर आप आंदोलनात सहभागी होत आहे. गोव्यातही काँग्रेसबरोबर ‘आप’चे आघाडी करण्याचे कोणतेही प्रयोजन नसल्याचा पुनरुच्चार गोवा प्रभारी तथा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी यांनी शनिवारी केला होता. त्यावर पाटकर यांनी ‘गोमन्तक''कडे भूमिका मांडली.

पाटकर म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी राज्यभर बांधणी सुरू केली आहे. पक्ष संघटन वाढविण्याचा सर्वांचा अधिकार आहे. केंद्रीय स्तरावर ‘आप’ची भूमिका वेगळी राहिली आहे.

त्यामुळे तीच भूमिका गोव्यात राहील, असेही नाही. कारण स्थानिक नेत्यांनी २०२७ च्या निवडणुकीत भाजपला पराभूत करायचे असल्यास सर्व विरोधी पक्षांनी म्हणजे काँग्रेससह सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले आहे.

काँग्रेसने राज्यभर सर्व मतदारसंघांत संघटन मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे, तसे इतरांनीही काम सुरू केले आहे. आतिषी या गोव्यात आल्यावर तेच सांगतात. त्यामुळे त्यावर आताच बोलणे योग्य वाटत नाही, असेही पाटकर यांनी नमूद केले.

‘त्या’ वादावर खर्गेंकडून पडदा

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याविरुद्ध ‘एनएसयूआय’चे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याकडे लेखी पाच पानी तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून राज्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पाटकर यांनी हे प्रकरण राष्ट्रीय अध्यक्षांकडे पोहोचवले. मात्र, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तक्रारींकडे लक्ष देऊ नका, काम करीत रहा, अशा सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या वादावर पडदा पडल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोडलेला हात आणि पाय, लंगडी घालत आला पोलिस स्थानकात; ऑस्ट्रेलियन खेळाडुंची छेड काढणाऱ्या संशयिताला अटक Watch Video

Satish Shah: सलग 55 एपिसोडमध्ये साकारल्या 55 भूमिका, सतीश शाहांचे निधन; हसऱ्या चेहऱ्याचा पडला पडदा

गोव्यात प्रथमच पार पडली वजन-माप खात्याच्या नियंत्रकांची राष्ट्रीय परिषद; CM सावंतांनी दिली ग्राहकांच्या हक्काचे जतन करण्याची हमी

हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

आमदार दिलायला लोबोंचा भिंत बांधकामावर प्रत्युत्तर; आरोपांना दिले राजकीय हेतूचे वळण

SCROLL FOR NEXT